नांदेड - आदर्श गाव म्हणून औरंगाबादच्या पाटोदा या गावाला देशभर ओळख निर्माण करून देणाऱ्या भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनलचा त्यांच्या गावात दारुण पराभव झाला. परंतु त्यांच्याच नावाने नांदेडच्या धामदरी (ता.अर्धापूर) येथे भास्करराव पेरे पाटील उभ्या केलेल्या विकास पॅनलचा मात्र दणदणीत विजय झाला आहे.
दत्ता पाटील कदम यांनी तयार केला होता पॅनल -
नांदेडमधील धामदरी (ता.अर्धापूर) येथील दत्ता पाटील कदम यांनी भास्करराव पेरे पाटील यांच्या नावाने पॅनल तयार केला होता. त्यांच्या पॅनलच्या यापूर्वीच दोन जागा बिनविरोध आल्या होत्या. तर पाच जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्या सर्व जागेवरही उमेदवार विजयी झाले आहेत.
व्यक्तीगत पराभव होऊ शकतो विचारांचा नाही -
पाटोदा गावाला देशभरात ओळख निर्माण करून देण्यात भास्करराव पेरे पाटील यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या गावाप्रमाणे इतर गावे व्हावीत, यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. त्यांच्या सर्वत्र त्यांना आदर्श मानले जातात. कामाने जरी त्यांना नाकारले असले, तरी त्यांच्या नावावर मात्र विजय झाला आहे. भास्करराव पेरे पाटील यांना टार्गेट करून त्यांच्या पॅनलचा पराभव झाला. परंतु त्यांच्या विचारांचा पराभव कुणी करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार प्राचार्य सुनील कदम यांनी दिली आहे.
सर्व उमेदवार सुशिक्षित -
ग्रामपंचायत निवडणुकीत प्राचार्य सुनिल कदम यांच्या नेतृत्त्वाखाली भास्कर पेरे पाटील विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला. या पॅनलच्या दोन जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्या आहेत. पाच जागांसाठी निवडणूक झाली. यातील सर्व उमेदवार सुशिक्षित आहे. विजयी उमेदवारामध्ये गोदावरी मुरलीधर कदम, सुनील उत्तमराव कदम, मस्के पांडूरंग, विलास झोडगे, मस्के कमल, प्रतिभा दत्तात्रय कदम, वंदना रंगराव खंदारे आदींचा समावेश आहे.
हेही वाचा - 'आदर्श' गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटलांच्या पॅनलचा दारूण पराभव