ETV Bharat / state

Bharat Rashtra Samiti : भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रात चार सभा घेणार; नांदेडमध्ये होणार बीआरएस पक्षाची पहिली जाहीर सभा - भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रात चार सभा घेणार

तेलंगणा राष्ट्र समिती पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून विस्तार कारण्यासठी सज्ज असून भारत राष्ट्र समिती ( Bharat Rashtra Samiti ) पक्ष महाराष्ट्रातील पहिली सभा नांदेड मध्ये घेणार आहे. तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री KCR ( Telangana Chief Minister KCR ) अर्थात कुलवकुंथाला चंद्रशेखर राव यांच्या TRS ( Telangana Rashtra Samithi ) या पक्षाचे नाव बदलून त्यांनी भारत राष्ट्र समिती हे नाव केले आहे. दरम्यान TRS हा पक्ष फक्त राज्य स्तरावर न राहता त्याचे राष्ट्रीय पक्ष म्हणून वाटचाल सुरू करण्यासाठी TRS चे नाव बदलून BRS अथवा भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले आहे. (First public meeting of BRS party in Nanded)

Telangana Chief Minister KCR
तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री कुलवकुंथाला
author img

By

Published : Jan 3, 2023, 1:55 PM IST

नांदेड : हैद्राबाद स्थित एमआयएम या राजकीय पक्षानंतर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा भारत राष्ट्र समिती हा राजकीय पक्ष नांदेडमध्ये प्रवेश करू पाहत आहे. त्यासाठी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री पुढच्या आठवड्यात नांदेड दौऱ्यावर ( First public meeting of BRS party in Nanded ) येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील तेलंगणा सीमेवरच्या तेलगू भाषिक लोकांना आकर्षित करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येणार असल्याची चर्चा आहे. ( BRS party in Nanded ) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत भारत राष्ट्र समिती पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा मानस तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या नांदेड दौऱ्यावरून वादंग होण्याची चिन्हे आहेत.

तेलंगणा राष्ट्र समिती पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून पक्ष वाढ कारण्यासठी सज्ज : BRS पक्षाचे राष्ट्रीय पक्ष म्हणून विस्तारीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री केसीआर यांनी कंबर कसली असून या अगोदर कर्नाटक राज्यात बैठका आणि सभांचे सत्र सुरू केले. तर तेलंगणा राष्ट्र समिती अथवा बीआरएस ( BRS ) पार्टी महाराष्ट्रात आपल्या पक्षाची वाटचाल सुरू करण्यासाठी पहिली जाहीर सभा नांदेड येथे घेणार आहे. दरम्यान यासाठी बीआरएस ( BRS ) पक्षा कडून आज सभेचे स्थान निश्चित करण्यासाठी स्थळ पाहणी करण्यात आली. या महिन्याच्या सात तारखेनंतर पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर राव हे नांदेड येथील पवित्र श्री हुजूर साहब सचखंड गुरुद्वाऱ्याचे दर्शन घेतील, यानंतर बीआरएस ( BRS ) पक्षाच्या महाराष्ट्रातील वाटचालीची सुरुवात करतील. (Telangana Rashtra Samithi )

महाराष्ट्रात 'या' भागात बैठका : महाराष्ट्रात 7 जानेवारी अगोदर नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा सीमावर्ती भाग असणाऱ्या किनवट, माहूर, बिलोली, देगलुर, धर्माबाद या तालुक्यातील गावांमध्ये पक्ष कार्यकर्ते आमदार हे बैठका घेतील तर 7 जानेवारी नंतर KCR (Telangana Chief Minister KCR) यांची पहिली जाहीर सभा नांदेडात पार पडेल. महाराष्ट्रात बीआरएस (BRS) पक्षाचे अध्यक्ष KCR यांच्या या महिन्यात नांदेड, शिवनेरी किल्ला, परभणी आणि औरंगाबाद अशा चार सभा होणार आहेत. पहिली सभा नांदेड येथे पार पडल्यानंतर दुसरी जाहीर सभा ही थेट शिवनेरी किल्यावर होणार असल्याची माहिती बीआरएस ( BRS ) पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ता माणिक कदम यांनी दिली आहे.

राष्ट्रीय पक्षात रुपांतर होणार : दसऱ्याला दुपारी खासदार, आमदार, एमएलसी, टीआरएस राज्य नेत्यांच्या संमतीने केसीआर यांच्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा केली जाईल, असे दिसते. विद्यमान तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) राष्ट्रीय पक्षात रुपांतर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर भारत राष्ट्र समिती, इतर नावे यासाठी आधीच विचाराधीन आहेत. दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय पक्षाबाबतचा प्रस्ताव दिल्यानंतर तो मंजुरीसाठी दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल, असे सांगण्यात आले होते. पक्षाचे चिन्ह तेच असावे अशी मागणी त्यांची होती. याशिवाय राष्ट्रीय पक्षाचा ध्वजात भारताच्या प्रतिमेसोबत गुलाबी रंगाचाही समावेश करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.