नांदेड - राज्यात शिवसेना आमदारांनी मोठ्या संख्येत बंडखोरी केल्यामुळे आता ज्या- ज्या मतदारसंघात ही बंडखोरी झाली आहे, तेथे पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही बैठका आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत संपर्क वाढवला आहे. नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांनीही शिंदेगटात सहभागी होत शिवसेनेशी फारकत घेतली. त्यामुळे, नांदेडमधील शिवसेना नेत्यांनी आज मेळावा घेतला. त्यावेळी, बालाजी कल्याणकर यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली आहे. पक्षाने निवडणुकीसाठी आमदार बालाजी कल्याणकर यांना दीड कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे.
पक्षाने निवडणुकीसाठी आमदार बालाजी कल्याणकर यांना दीड कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे. नांदेडमध्ये आज शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव आणि शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. सध्या राज्यात पसरलेली राजकीय अस्थिरता यात शिवसैनिकांत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.