ETV Bharat / state

'कोरोना'पुढे माणुसकी हरली, स्थलांतरित मजुरांची अजूनही पायपीट सुरूच

संपूर्ण देशामध्ये कोरोनामुळे महामारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, अचानक घ्याव्या लागलेल्या निर्णयामुळे नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून हजारो नागरीकांची गावाकडे पायपीट सुरू आहे.

Nanded
नांदेड
author img

By

Published : May 8, 2020, 4:35 PM IST

Updated : May 8, 2020, 6:19 PM IST

नांदेड - लॉकडाऊनमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यात आलेल्या परप्रांतीय मजुरांची स्थिती विदारक आहे. रोजगार बंद पडल्याने हजारो लोक पायीच गावाकडे निघाले आहेत. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाल्यानंतरीही मजुरांची पायपीट सुरूच आहे. या मजुरांच्या मदतीसाठी प्रामाणिक भावनेने पुढे अनेक हात पुढे येतात. मात्र, काही जणांच्या मनात कोरोनाची चुकचुकली तर मदतीसाठी पुढे येणारे हातही मागे जात आहेत. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने माणुसकी हरवल्याची जाणीव होत आहे.

स्थलांतरित मजुरांची अजूनही पायपीट सुरुच

संपूर्ण देशामध्ये कोरोनामुळे महामारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, अचानक घ्याव्या लागलेल्या निर्णयामुळे नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून हजारो नागरीकांची गावाकडे पायपीट सुरू आहे. तर सरकारने या मजुरांना आहे त्या ठिकाणी थांबण्याचे आवाहन केले आहे. तरीही मजुरांना त्रास होत असल्यामुळे हजारो मजुरांनी पायपीट करत आपले गाव गाठले आहे.

लॉकडाऊन 3 मेनंतर शिथिल होईल, अशी अपेक्षा ठेवून अनेक प्रवासी व परप्रांतीय कामगार आहे त्या ठिकाणीच थांबले होते. मात्र, लॉकडाऊनची मुदत पुन्हा 17 मेपर्यंत वाढल्यानंतर कामगारांनी गावाची वाट धरली. यादरम्यान शासनस्तराववरून ऑनलाइन परवानगी, रेल्वे, बस अशा कितीही घोषणा होत असल्या तरी श्रमकरी आणि कष्टकरी गरिबांची पायपीट सुरुच आहे.

या कामगारांना शेकडो-हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागत आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करताना डोक्यावर संसारोपगी साहित्य, सोबत महिला, वृद्ध, लहान मुले यांचा समावेश आहे. पोटाची भूक भागविण्यासाठी कामाच्या शोधात आलेले हे मजूर हाताला काम नाही, राहायला जागा नाही, खायला अन्न नाही अशा कठीण परस्थितीतून जात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे घर जवळ करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

कोरोनाने माणुसकी नष्ट केली - डॉ. वानखेडे

गेल्या 1 महिन्यापासून हजारो कामगार नांदेड-नागपूर या राष्ट्रीय महामार्गवरून गावाकडे निघाले आहेत. हा मार्ग दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, राजस्थानसह अनेक राज्यात जातो. या मार्गावरून मी चेन्नई ते उत्तरप्रदेश पर्यंतचा प्रवास केलेले यात्री पाहिले आहेत. जवळपास हजारो किलोमीटरचा प्रवास करताना कुणीही यांच्या मदतीला येताना दिसत नाही. कधी-कधी वाटते की या कोरोनाने ती माणुसकी नष्ट केली आहे, असे सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रसाद वानखेडे यांनी सांगितले.

डॉ. प्रसाद वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते

Last Updated : May 8, 2020, 6:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.