ETV Bharat / state

नांदेडमध्ये हळदीच्या लिलावासाठी व्यापाऱ्यांची टाळाटाळ; ६०० ते ९०० टन हळद विक्रीविना पडून - नांदेड

हळदीचा नांदेड येथे मोठा व्यापार असून हळद खरेदी करणारे अनेक व्यापारी आहेत. परंतु पाडव्यानंतर नवा मोंढा येथे हळदीचे लिलाव करण्यासाठी अनेक व्यापारी हजर राहत नाहीत. केवळ एक - दोन व्यापारी लिलाव होताना थांबतात. बाकीचे मात्र निघून जातात. त्यामुळे हळदीचे लिलाव होण्यासाठी विलंब होत आहे.

नांदेडमध्ये हळदीच्या लिलावासाठी व्यापाऱ्यांची टाळाटाळ; ६०० ते ९०० टन हळद विक्रीविना पडून
author img

By

Published : Apr 9, 2019, 3:22 PM IST

नांदेड - हळदीचे लिलाव (बीट) करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे . त्यामुळे शेतकऱयांची जवळपास ६०० ते ९०० टन हळद खरेदीअभावी नवा मोंढा येथे पडून आहे. पाडव्यापासून हळदीचे लिलाव न झाल्याने शेतकरी त्रस्त असून ऐन लग्नसराईत शेतकऱयांना हळदीचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे संतप्त शेतकऱयांनी सोमवारी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

नांदेडमध्ये हळदीच्या लिलावासाठी व्यापाऱ्यांची टाळाटाळ; ६०० ते ९०० टन हळद विक्रीविना पडून

हळदीचे पैसे हातात पडल्यानंतर लेकी बाळीच्या लग्नासाठी कामाला येतील या हेतूने अनेक शेतकऱयांनी हळद विक्रीसाठी बाजारात आणली आहे . पाडव्यापासून सुमारे ६०० ते ७०० टन हळद बाजारात आली आहे. परंतु व्यापाऱ्यांनी हळदीचे लिलाव करण्यासाठी विलंब लावल्यामुळे शेकडो टन हळद नवा मोंढा येथील आडत्याच्या गोडाऊनमध्ये तशीच पडून आहे.

हळदीचा नांदेड येथे मोठा व्यापार असून हळद खरेदी करणारे अनेक व्यापारी आहेत. परंतु पाडव्यानंतर नवा मोंढा येथे हळदीचे लिलाव करण्यासाठी अनेक व्यापारी हजर राहत नाहीत. केवळ एक - दोन व्यापारी लिलाव होताना थांबतात. बाकीचे मात्र निघून जातात. त्यामुळे हळदीचे लिलाव होण्यासाठी विलंब होत आहे.

वास्तविक हळदीची आवक जास्त प्रमाणात असल्याने व्यापाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी करणे आवश्यक आहे. मोंढ्यात लिलाव न करता अनेक व्यापारी कमी भावाने परस्पर दुकानावर हळदीची खरेदी करत आहेत. याचा फटका शेतक ऱयांनाही बसत असल्याची तक्रार आहे. व्यापाऱयांनी लिलाव करुनच हळद खरेदी करावी अशीही शेतकऱयांची मागणी आहे. वसमत येथे हळदीला १० हजार २०० रुपयापर्यंत भाव मिळत आहे . त्या उलट नांदेडच्या बाजारात ६० हजार ५०० पर्यंत प्रति क्विंटल भाव मिळत असताना त्यातही लिलाव करण्यासाठी व्यापारी आपसात संगनमत करुन शेतकऱयांची अडवणूक करीत असल्याची तक्रार आनंदा दिगंबर कदम ( बामणी ) , खंडेराव हाके ( भोगाव ता . अर्धापूर ) , सोनाजी साळवे ( दिग्रस ) , नागेश गोरे , प्रकाश नरोटे ( चोरंबा ) , संग्राम दगडे ( बामणी ) आदी शेतकऱयांनी केली आहे.

या बाबतीत कृषी उत्पन्न बाजार समितीने मध्यस्थी करुन हा प्रश्न मिटवायला पाहिजे असे मतही शेतकऱ्यांनी या वेळी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या मालाचे लिलाव पूर्ण होईपर्यंत सर्व व्यापाऱयांनी येथे थांबले पाहिजेत, असे दिगंबर आबाराव सवंडकर या आडत दुकानदाराने या वेळी व्यक्त केले . दरम्यान या प्रकरणी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बी . आर . कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, उद्या पर्यंत शेतकरी, खरेदेदार व्यापारी आणि आडते यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे म्हणाले.

Intro:नांदेडमध्ये हळदीचे बीट करण्यासाठी व्यापाऱ्यांची टाळाटाळ;६०० ते ९०० टन हळदीचे बीट थांबले....!Body:नांदेडमध्ये हळदीचे बीट करण्यासाठी व्यापाऱ्यांची टाळाटाळ;६०० ते ९०० टन हळदीचे बीट थांबले....!

नांदेड:हळदीचे बीट करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे . त्यामुळे शेतक - यांची जवळपास ६०० ते ९०० टन हळद खरेदीअभावी नवा मोंढा येथे पडून आहे.
पाडव्यापासून हळदीचे बिट न झाल्याने शेतकरी त्रस्त असून ऐन लग्नसराईत शेतक - यांना हळदीचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे संतप्त शेतक - यांनी सोमवारी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. हळदीचे पैसे हातात पडल्यानंतर लेकी बाळीच्या लग्नासाठी कामाला येतील या हेतूने
अनेक शेतक - यानी हळद विक्रीसाठी बाजारात आणली आहे . पाडव्यापासून सुमारे ६०० ते ७०० टन हळद बाजारात आली आहे. परंतु व्यापाऱ्यांनी हळदीचे बिट करण्यासाठी विलंब लावल्यामुळे शेकडो टन हळद नवा मोंढा येथील
आडत्याच्या गोडाऊनमध्ये तशीच पडून आहे.
हळदीचा नांदेड येथे मोठा व्यापार असून हळद खरेदी करणारे अनेक व्यापारी आहेत. परंतु पाडव्यानंतर नवा मोंढा येथे हळदीचे बिट करण्यासाठी अनेक व्यापारी हजर राहत नाहीत. केवळ एक - दोन व्यापारी बिट होताना थांबतात. बाकीचे मात्र निघून जातात. त्यामुळे हळदीचे बिट होण्यासाठी विलंब होत आहे.
वास्तविक हळदीची आवक जास्त प्रमाणात असल्याने व्यापाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी करणे आवश्यक आहे.

मोंढ्यात बिट न करता अनेक व्यापारी कमी भावाने परस्पर दुकानावर हळदीची खरेदी करत आहेत. याचा फटका शेतक - यांनाही बसत असल्याची तक्रार आहे. व्यापा - यांनी बिट करुनच हळद खरेदी करावी अशीही शेतक - यांची मागणी आहे. वसमत येथे हळदीला १० हजार २०० रुपयापर्यंत भाव मिळत आहे . त्या उलट नांदेडच्या बाजारात ६० हजार ५०० पर्यंत प्रति क्विंटल भाव मिळत असताना त्यातही बिट करण्यासाठी शेतकरी आपसात संगनमत करुन शेतक - यांची अडवणूक करीत असल्याची तक्रार आनंदा दिगंबर कदम ( बामणी ) , खंडेराव हाके ( भोगाव ता . अर्धापूर ) , सोनाजी साळवे ( दिग्रस ) , नागेश गोरे , प्रकाश नरोटे ( चोरंबा ) , संग्राम दगडे ( बामणी ) आदी शेतक - यांनी केली.
या बाबतीत कृषी उत्पन्न बाजार समितीने मध्यस्थी करुन हा प्रश्न मिटवायला पाहिजे असे मतही शेतकऱ्यांनी या वेळी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या मालाचे बिट पूर्ण होईपर्यंत सर्व व्यापा - यांनी येथे थांबले पाहिजेत , असे दिगंबर आबाराव सवंडकर या आडत दुकानदाराने या वेळी व्यक्त केले . दरम्यान या प्रकरणी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बी . आर . कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की , उद्या पर्यंत शेतकरी , खरेदीदार व्यापारी आणि आडते यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.