ETV Bharat / state

बिनधास्त प्रवास करा, अन् मनाप्रमाणे पैसे द्या; ऑटोचालकाची अभिनव योजना - Police

महागाईच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळावा, असा उपक्रम त्याने सुरु केला आहे. 'ऑटोमध्ये प्रवास करा आणि मनात येईल तेवढेच पैसे द्या', असे ठळक अक्षरात ऑटोच्या चारही बाजूनी लिहीण्यात आलेले आहे. शहरात धावणारा त्याचा हा ऑटो चर्चेचा विषय बनला आहे.

ऑटो
author img

By

Published : Feb 22, 2019, 8:04 AM IST

नांदेड - शहरातील वाहतुकीच्या कोंडीचे प्रमुख कारण किंवा प्रवाशांसोबत हुज्जत घालणारे, असे अनेक आरोप ऑटोचालकावर होत असतात. परंतु, या आरोपांना छेद देण्याचे काम शहरातील एका ऑटो चालकाने केले आहे. महागाईच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळावा, असा उपक्रम त्याने सुरु केला आहे. 'ऑटोमध्ये प्रवास करा आणि मनात येईल तेवढेच पैसे द्या', असे ठळक अक्षरात ऑटोच्या चारही बाजूनी लिहीण्यात आलेले आहे. शहरात धावणारा त्याचा हा ऑटो चर्चेचा विषय बनला आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्याने परिणामी प्रवाशी वाहतुक करणार्‍या वाहन धारकांनी प्रवास भाड्यात वाढ केली आहे. ऑटोमध्ये बसताच प्रवाशांना १० रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. काही वेळा, तर प्रवास भाड्यावरुन प्रवाशी आणि ऑटोचालकांचा वादही होतो. परंतु, या सर्व प्रकाराला छेद देण्याचे काम शहरातील दुल्हेशाहनगर येथील शेख अहमद शेख अनवर या ऑटोचालकाने केले आहे. शहरातील गरजु, गरीब प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी आपल्या ऑटोवर 'अपने दिलसे किराया देना', असे ठळक अक्षरात लिहून प्रवाशी आपल्या मनाने जो किराया देतील ते खुशीने स्विकारत आहेत. ऑटोचालक शेख अहमद यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर, या उपक्रमामुळे त्यांच्या ऑटोतून प्रवास करणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे.

undefined

या उपक्रमाबद्दल ऑटोचालक शेख अहेमद यांना विचारले असता, नांदेड येथील प्रवाशी सुरुवातीपासूनच आपल्या मनानेच भाडे देतात. परंतु ठळक अक्षरात लिहून ठेवण्याचा फायदा एवढाच, की यामुळे गरजु आणि गरीब प्रवाशांना दिलासा मिळत आहे. या उपक्रमामुळे ऑटो चालविणे परवडते का? असे विचारले असता, देणारा देव आहे, या उपक्रमामुळे मजूरी मिळून जाते. उदरनिर्वाह चालतो या पेक्षा जास्त काही नको, असे सांगत आपण मागील १९ वर्षापासून नांदेड शहरात ऑटो चालवत असल्याचे शेख अहेमद यांनी सांगितले. शहरात धावणारा हा ऑटो चर्चेचा विषय बनला आहे. लोक कुतुहलाने दिलदार शेख अहेमद यांच्या ऑटोतून प्रवास करत आहेत.

Intro:बिनधास्त प्रवास करा...अन तुमच्या मनाप्रमाणे पैसे द्या...!
नांदेडमध्ये ऑटोचालकाची प्रवाशांसाठी अभिनव योजना...

नांदेड : शहरातील वाहतुकीच्या कोंडीचे प्रमुख कारण किंवा प्रवाशांसोबत उच्चत घालणारे असे अनेक आरोप ऑटोचालकावर होत असतात परंतु या आरोपांना छेद देण्याचे काम शहरातील एका ऑटो चालकाने केले असून महागाईच्या या काळात प्रवाशांना दिलासा मिळावा असा उपक्रम त्याने सुरु केला आहे. ऑटोमध्ये प्रवास करा आणि जे मनात येईल ते तेवढेच पैसे द्या असे ठळक अक्षरात ऑटोच्या चारही बाजूनी लिहीण्यात आलेले असून शहरात धावणारा हा ऑटो चर्चेचा विषय बनला आहे. लोक कुतुहलाने या ऑटोतून प्रवास करत आहेत.Body: पेट्रोल व डिझेलचे भाव वाढल्याने परिणामी प्रवाशी वाहतुक करणार्‍या वाहन धारकांनी प्रवास भाड्यात वाढ केली आहे. ऑटोमध्ये बसताच प्रवाशांना १० रुपयांच्या वर पैसे मोजावे लागतात. काही वेळा तर प्रवास भाड्यावरुन प्रवाशी व ऑटोचालकांचा वाद होतो. परंतु या सर्व प्रकाराला छेद देण्याचे काम शहरातील दुल्हेशाहनगर येथील शेख अहेमद शेख अनवर या ऑटोचालकाने केले आहे. शहरातील गरजु, गरीब प्रवाशांची सोय व्हावी यासाठी आपल्या ऑटोवर ‘अपने दिलसे किराया देना’ असे ठळक अक्षरात लिहून प्रवाशी आपल्या मनाने जो किराया देतील ते खुशीने स्विकारत आहेत. ऑटोचालक शेख अहेमद यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर या उपक्रमामुळे त्यांच्या ऑटोतून प्रवास करणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे.Conclusion:या उपक्रमाबद्दल ऑटोचालक शेख अहेमद यांना विचारले असता नांदेड येथील प्रवाशी सुरुवातीपासूनच आपल्या मनानेच भाडे देतात परंतु ठळक अक्षरात लिहून ठेवण्याचा फायदा एवढाच की यामुळे गरजु आणि गरीब प्रवाशांना दिलासा मिळत आहे. मागील काही दिवसापुर्वी भारत बंदच्या दरम्यान एक जोडपे आपल्या लहान मुलाला घेवून दवाखान्यात जात होते. यावेळी त्यांना अन्य ऑटोचालकांनी जास्त भाड्याची मागणी केली. परंतु माझ्या ऑटोवर ठळकपणे मनाला वाटेल तेवढेच पैसे द्या असे लिहिलेले असल्याने त्या प्रवाशांनी त्यांच्या मनाने भाडे दिले. रुग्णाला दवाखाण्यापर्यंत पोहचविण्याचे समाधान मिळाले असल्याचे ऑटोचालक शेख अहेमद यांनी सांगितले. या उपक्रमामुळे ऑटोचालविणे परवडते का असे विचारले असता देणारा देव आहे, या उपक्रमामुळे मजूरी मिळून जाते. उदरनिर्वाह चालतो या पेक्षा जास्त काही नको असे सांगत आपण मागील 19 वर्षापासून नांदेड शहरात ऑटो चालवत असल्याचे शेख अहेमद यांनी सांगितले. शहरात धावणारा हा ऑटो चर्चेचा विषय बनला आहे. लोक कुतुहलाने दिलदार शेख अहेमद यांच्या ऑटोतून प्रवास करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.