नांदेड: या निवडणुकीत ७ हजार ८३ पुरूष व १ हजार ८८४ स्त्री शिक्षक मतदार, असे एकूण ८ हजार ९६७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ३० मतदान केंद्रांसाठी २७ क्षेत्रिय अधिकारी व ३० सुक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्र परिसरात २०० मीटरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे वेबकास्टींग करण्यात येणार आहे.
मतदान केंद्र : नांदेड शहर मल्टिपर्पज हायस्कूल येथे मतदान केंद्र आहे. हॉल क्रमांक १, २ व ३, मुदखेड तहसील कार्यालय येथे आहेत. अर्धापूर जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा (मुलींची), भोकर तहसील कार्यालय, उमरी तहसील कार्यालय, कंधार प्रियदर्शनी हायस्कूल, कुरुळा जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, पेठवडज जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, उस्माननगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोहा तहसील कार्यालय, माळाकोळी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, किनवट जिल्हा परिषद हायस्कूल (मुलांची), मांडवी जिल्हा परिषद हायस्कूल, इस्लापूर जिल्हा परिषद हायस्कूल, माहूर जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, हदगाव जिल्हा परिषद हायस्कूल, मनाठा जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, निवघा जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, हिमायतनगर जिल्हा परिषद हायस्कूल, देगलूर तहसील कार्यालय, मरखेल जिल्हा परिषद हायस्कूल, बिलोली तहसील कार्यालय, सगरोळी ज्यु. बेसिक स्कूल जिल्हा परिषद, धर्माबाद तहसील कार्यालय, नायगाव बाजार जिल्हा परिषद हायस्कूल (मुलींची), मुखेड जिल्हा परिषद हायस्कूल (मुलींची) व बाऱ्हाळ जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे.
लोहा तालुक्यात ५४३ मतदार : मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी लोहा तालुक्यात दोन मतदान केंद्र आहे. एकूण ५४३ मतदार लोहा व माळाकोळी व उस्माननगर मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तहसील कार्यालय १०६ व माळाकोळी येथील मतदान केंद्र १०७ क्रमांक आहे, असे तहसीलदार मुंडे यांनी कळविले आहे. लोहा तालुक्यातील शिक्षक मतदारसंघात लोहा सर्कलमध्ये १८१ पुरुष व ३५ स्त्रीया असे एकूण २१६ मतदार आहेत. माळाकोळी ११० पुरुष व १४ स्त्रीया असे एकूण १२४ मतदार आहे. कलंबर येथे ५६ पुरुष व ६ स्त्रीया या असे एकूण ६२ मतदार आहेत. सोनखेड येथे ५९ पुरुष व ७ स्त्रीया असे एकूण ६६ मतदार आहे. शेवडी (बा) येथे ३६ पुरुष व ९ स्त्रीया असे एकूण ४५ मतदार आहे. कापशी (बु) येथे २६ पुरुष व ४ स्त्रिया एकूण ३० मतदार आहेत. असे तालुक्यात ४६८ पुरुष व ७५ स्त्रीया असे एकूण ५४३ शिक्षक मतदार आहेत. लोहा मतदान केंद्रावर ३२७ तर माळाकोळी मतदान केंद्रावर १२४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.