ETV Bharat / state

नांदेड : शेतात काम करणाऱ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; पाच जण जखमी - लोहा कुटुंबावर प्राणघातक हल्ला

शेतात बोअरमध्ये विद्युत मोटार टाकण्यासाठी साहित्य घेऊन जात असताना त्यांच्याच शेताच्या वाटेवर दारू पित बसलेल्या पोलेवाडीतील टोळक्याने बाजूला सरका.. असे कसे काय म्हणाला? यावरून वादावादी केली. पोले गावातील लोकांना बोलावून जातीवाचक शिवीगाळ आणि प्राणघातक हल्ला जोंधळे कुटुंबीयांवर केला.

नांदेड
नांदेड
author img

By

Published : Dec 20, 2020, 5:29 PM IST

Updated : Dec 20, 2020, 6:41 PM IST

नांदेड - शेतात काम करणाऱ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत पाच जण जखमी झाले असून १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही लोहा शहरातील घटना आहे.

शेतात बोअरमध्ये विद्युत मोटार टाकण्यासाठी साहित्य घेऊन जात असताना त्यांच्याच शेताच्या वाटेवर दारू पित बसलेल्या पोलेवाडीतील टोळक्याने बाजूला सरका.. असे कसे काय म्हणाला? यावरून वादावादी केली. पोले गावातील लोकांना बोलावून जातीवाचक शिवीगाळ आणि प्राणघातक हल्ला जोंधळे कुटुंबीयांवर केला. यात पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी लोहा शहरातील आयटीआय परिसरात घडली याप्रकरणी रात्री उशिरा लोहा पोलिसात अ‌ॅट्रोसिटी व कलम ३०७ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतात मोटार टाकण्याचे करत होते काम

गेल्या काही महिन्यांपासून या वाडी गावातील काही टोळक्याने उच्छाद घातला आहे. शहरात मारामारी करून हे फरार होत आहेत, त्यामुळे सामाजिक एकोपा बिघडत चालला आहे. जुन्या शहरातील विजय इरबाजी जोंधळे, मधुकर इरबाजी जोंधळे हे शासकीय गोदामात काम करतात. आयटीआय लगतच्या माळावर त्यांची गायरान मालकीची जमीन आहे. मागील तीन दिवसांपूर्वी या भावंडांनी आपल्या कष्टाच्या कामातून पैसे जमा केले आणि बोअर पाडले, त्याला चांगले पाणी लागले. शुक्रवारी मधुकर इरबाजी जोंधळे (वय ४५), त्यांचा जावई मंगेश विजय पंडित (वय 32), सोहन मधुकर जोंधळे, (वय २१) पवन मधुकर जोंधळे, (वय १७) आणि तक्रारदार धीरज विजय जोंधळे (वय २५) आपल्या शेतात मोटार टाकण्याचे काम करत होते.

बाजूला सरका म्हणाले, म्हणून केली बेदम मारहाण....!

काही जण जोंधळे यांच्या शेतात जाणाऱ्या रस्तात दारू पित बसले यांनी भाऊ बाजूला सरका.. साहित्य नेत आहोत लागेल, असे सांगितले. पण दारूच्या नशेत असलेल्यांनी मंगेश आणि पवन यांच्याशी हुज्जत घातली आणि पोलेवाडीत फोन करून तरुणांना बोलावून घेतले. दता बाजगीर, संदीप बाजगीर, धीरज हाके, वैभव हाके, कमलाकर बाजगीर आणि इतर सात-आठ जणांनी शेतात काम करणाऱ्या या जोंधळे कुटुंबीयांना लोखंडी गजाळी, लाकडी काट्या फायटर, दगड-धोंड्यानी डोक्यात पाठीत व गुप्तांगावर बेदम मारहाण केली. यात मंगेशला एका झुडपात ढकलून दिले. अर्ध्या तासाहून अधिक काळ या टोळक्यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पोलिसांना ही माहिती देण्यात आली.

पोलिसांनी वाढविला बंदोबस्त....!

मारेकरी फरार झाले, असे तक्रारदार धीरज जोंधळे यांनी सांगितले. या हाणामारीत मधुकर जोंधळे, त्यांची मुले, भाचा आणि जावई मंगेश व धीरज यांना बेदम मारहाण झाली, पाचही जण जखमी झाले असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना कळताच शहरात मोठा जमाव जमला होता. पोलीस उपायुक्त किशोर कांबळे, पोलीस निरीक्षक भागवत जायभाये, पोलीस उपनिरीक्षक एम. जी सोनकांबळे व पोलिसांनी तत्परता दाखवीत बंदोबस्त वाढविला.

लोह्यात जुनी पण नव्याने सुरू झालेल्या वाईन मार्ट परिसरात सतत हाणामारी होत असून लोह्यचे सामाजिक वातावरण दूषित होत आहे. तक्रारदार धीरज जोंधळे (वय २५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी दत्ता बाजगीर, संदीप बाजगीर, कमलाकर बाजगीर, धिरज हाके, वैभव हाके व इतर सात ते आठ जणांविरुद्ध कलम भादवि ३०७, ( जीवे मारण्याचा प्रयत्न ) १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, या अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा कलम ३ (१) (आर) (एस) 3 ( 2)( 5) (अ) १९८९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून तपास उपायुक्त किशोर कांबळे हे करीत आहेत

कार्यकर्त्यांची संयमाची भूमिका, मोठा अनर्थ टळला......!

शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी संयम पाळला. सर्व मतभेद विसरून गावातील (शहरातील) सर्व जाती-धर्माच्या कार्यकर्त्यांनी मोठा अनर्थ होऊ नये, यासाठी मारामारी करणाऱ्यांवर कायद्याने कार्यवाही व्हावी, अशी भूमिका घेतली त्यामुळे अनर्थ टळला. समाजिक एकोपा बिघडविणाऱ्या लोकांना एकत्रित येत जणू संदेशच दिला. सर्वांच्या संयमी भूमिकेमुळे जमाव शांत झाला, त्यामुळे सामाजिक तणाव निवळला डीवायएसपी किशोर कांबळे यांनी रात्रीच घटनास्थळी व रुग्णालयात जाऊन पाहणी केली गुन्हा दाखल करण्याचा व तपासाच्या सूचना दिल्या.

Last Updated : Dec 20, 2020, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.