नांदेड - एमआयएम किंवा वंचितला मत देणे भाजपसाठी फायदेशीर ठरते, याची मतदारांना जाणीव झाली आहे. या निवडणुकीत वंचितचा उमेदवार असणे भाजपच्याच रणनीतीचा भाग होता. पण लोकांनी ही रणनीती ओळखली, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. देगलूर निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर हे विजयी झाल्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण म्हणाले की, देगलूरच्या विजयाने महाविकास आघाडी व राज्य सरकार नक्कीच भक्कम झाले आहे. राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असताना जनतेने दिलेला हा कौल महत्त्वाचा आहे. देशात झालेल्या निवडणुकांच्या निकालावरुन जनता भाजपच्या विरोधात असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
हेही वाचा-देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी
भाजपने व्यक्तिगत टिकेवर भर दिला..!
देगलूर पोटनिवडणुकीत मी विकासाचा अजेंडा मांडला, तर भाजपने वैयक्तिक टिकेवर भर दिला. परिणाम सर्वांसमोर आहे.
जितेशचा विजय म्हणजे स्वर्गीय अंतापूरकर यांना श्रद्धांजली...!
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उमेदवारी देण्यासंदर्भात घेतलेला निर्णय असो, राहुल गांधींची त्यामधील भूमिका असो, त्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार साहेब असोत, या सर्वांच्या आशीर्वादाने देगलूरला जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत. जितेश अंतापूरकरांना विजयी करून मतदारांनी स्वर्गीय आमदार रावसाहेब अंतापूरकरांना खरी श्रद्धांजली अर्पण केल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीतील विजय हा काँग्रेसवरील विश्वासाचे प्रतिक - नाना पटोले
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत. भाजपच्या सुभाष साबणेंचा त्यांनी 41933 मतांनी पराभव केला आहे. काँग्रेस-भाजपसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या या पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी
देगलूर पोटनिवडणुकीत मतमोजणीच्या एकूण तीस फेऱ्या पूर्ण झाल्या. यात जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना 1 लक्ष 8 हजार 789 तर भाजपच्या सुभाष पिराजीराव साबणे यांना 66 हजार 872 मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे उत्तम रामराव इंगोले यांना 11 हजार 347 यांना इतकी मते मिळाली. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर हे 41 हजार 933 मतांनी विजयी झाले आहेत.