नांदेड Ashok Chavan Opinion: इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला नसताना महाराष्ट्रातील जागा वाटपासाठी वंचित बहुजन आघाडी तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यामध्ये जागा वाटपावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. (India Alliance) महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीने 12 जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केल्याने महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. असे असले तरी जिंकण्याची परिस्थिती कोणाची आहे आणि कोण जागा निवडून आणू शकतो हेच खरं जागा वाटपाचं समीकरण असणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने अशोक चव्हाण यांनी दिली.
वंचितकडून 12 तर संजय राऊतांकडून 23 जागांची मागणी: वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीकडे लोकसभेच्या 12 जागांची मागणी केली. याबाबत काँग्रेसने अशोक चव्हाण यांना विचारले असता प्रत्येक जण आपापल्या इच्छेनुसार जागा मागत आहे. संजय राऊत यांनी 23 जागा शिवसेनेला मिळाव्या अशी इच्छा व्यक्त केली.
लोकसभेच्या जागा वाटपाचा फार्मूला अनिश्चित: प्रकाश आंबेडकर यांनी 12 जागांची इच्छा व्यक्त केली तर शरद पवार गटाची काही इच्छा असेल अशी गोळा बेरीज केली तर आकडा 48च्या वर जाईल; परंतु जिंकण्याची परिस्थिती कोणाची आहे, कोण जागा निवडून आणू शकतो हेच जागा वाटपाचं समीकरण असणार आहे, असं स्पष्ट मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. महाविकास आघाडीत अद्याप लोकसभेच्या जागा वाटपाचा फार्मूला ठरला नाही. जोपर्यंत काँग्रेसचे केंद्रीय श्रेष्ठी निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्हाला थांबावं लागणार असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले. इंडियामध्ये प्रवेश मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर धडपडत आहेत. मात्र, त्यांना सामील करून घेण्यास महाविकास आघाडीतील काही पक्षांचा आणि नेत्यांचा विरोध आहे. या कारणाने त्यांना सामावून घेण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
हेही वाचा: