नांदेड : राज्यपाल भगत सिंग कोशियारी यांनी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे ( Governor Controversial Statement ) पडसाद आज नांदेड मध्ये उमटले.काँग्रेस पक्षांनी आज महात्मा फुले पुतळ्या समोर राज्यपाल विरोधात घोषणा बाजी देत राज्यपाल यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला
राज्यपालांना बदलण्याची मागणी - छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी अन कर्मभूमी ही महाराष्ट्र आहे, याच महाराष्ट्राचे राज्यपाल सातत्याने महाराजांचा अवमान करत आहेत. आता सहनशक्ती संपली आहे. त्यामुळे या राज्यपालांना तात्काळ महाराष्ट्रातून बदलण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री अशोक चव्हाण ( Ashok chavan on Governor Controversial Statement ) यांनी केली आहे.
आफताबला फाशी द्यावी - नांदेड जिल्हा काँग्रेसतर्फे आज राज्यपालांच्या वक्तव्याच्या विरोधात शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी अशोक चव्हाण बोलत होते. तसेच श्रद्धा खून प्रकरणातील मारेकरी आफताब पुनावाला याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ही अशोक चव्हाण यांनी केली आहे.