ETV Bharat / state

नांदेडमध्ये काँग्रेसचा 'गड' शाबूत राहणार की भाजपचा 'प्रताप' घडणार ? - Election

नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि प्रतापराव पाटील यांच्यात लोकसभेचा सामना रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि भाजप नेते प्रतापराव पाटील
author img

By

Published : Mar 22, 2019, 11:11 PM IST

नांदेड - काँग्रेसचा गड शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण जिल्ह्यातील सर्व जाती-धर्माची वेगळी बैठक घेत आहेत. त्यांनी सोशल इंजिनियरिंगचा प्रयोग सुरू केला आहे. तर दुसरीकडे भाजपनेही काँग्रेसच्या गडाला पोखरून नवा 'प्रताप' घडवण्यासाठी बूथ पातळीपर्यंत काम सुरू केले आहे.

काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षानी 'वेट अँड वॉच' ची भूमिका घेतली आहे. एकमेकांचा उमेदवार पाहून आपला 'पत्ता' समोर कसा करता येईल याची वाट पाहत आहेत. तर काँग्रेसकडून अशोकराव चव्हाण की अमिता चव्हाण हे अद्याप स्पष्ट नाही. भाजपकडून प्रतापराव पाटील चिखलीकर की अन्य कुणी याबाबत सध्या तरी गुप्तताच आहे. पण जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळचे कट्टर मित्र आज कट्टर विरोधक अशोक चव्हाण विरुद्ध प्रतापराव असाच सामना होईल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. २ दिवस सुट्टीचे असल्यामुळे शेवटच्या टप्प्यातच सोमवारी किंवा मंगळवारी हे चित्र स्पष्ट होणार आहे.

नांदेड मतदारसंघाचे डॉ . शंकरराव चव्हाण, व्यंकटराव देशमुख तरोडेकर, भाई केशवराव धोंडगे, सूर्यकांता पाटील, अशोक चहाण अशा दिग्गजांनी नेतृत्व केले आहे . त्याचबरोबर भास्करराव पाटील-खतगावकर यांनी ३ वेळा, तर शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, देवराव कांबळे, व्यंकटराव देशमुख तरोडेकर या चौघांना दोनदा खासदार होण्याची संधी मिळाली आहे.

जिल्ह्यात १९५२ पासून ३ वेळा वगळता १४ वेळा काँग्रेसचाच खासदार निवडून आला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप असा राजकीय सामना अवलंबून असला तरी वंचित बहुजन आघाडीनेही नांदेडमधूनच आपले रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे यावेळी वंचित बहुजन आघाडी त्याच तुलनेने लढत देऊ शकते.

समाविष्ट विधानसभा मतदारसंघ

नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, भोकर, नायगाव, देगलूर आणि मुखेड

एकूण मतदार

एकूण : १७, ००, ९९१
पुरुष : ८, ८३, १३८
महिला : ८, १७, ७९५
इतर मतदार : ५८
नवमतदार : २, ६३, ३३७

आतापर्यंतचे खासदार

शंकरराव टेळकीकर आणि देवराव कांबळे (१९५२)
हरिहरराव सोनुले आणि देवराव कांबळे (१९५७)
तुळशीदास जाधव (१९६२)
व्यंकटराव देशमुख तरोडेकर, (१९६७ व १९७१)
केशवराव धोंडगे (१९७७)
डॉ .शंकरराव चव्हाण (१९८६ )
अशोक चव्हाण (१९८७)
डॉ .व्यंकटेश काब्दे (१९८९)
सूर्यकांता पाटील (१९९१)
गंगाधरराव देशमुख कुंटूरकर (१९९६)
भास्करराव पाटील खतगावकर (१९९८ , १९९९ , २००९)
डी . बी . पाटील (२००४)
अशोक चव्हाण (२०१४)

Intro:नांदेड मध्ये काँग्रेसचा 'गड' शाबूत राहणार की भाजपाचा 'प्रताप' घडणार..?Body:नांदेड मध्ये काँग्रेसचा 'गड' शाबूत राहणार की भाजपाचा 'प्रताप' घडणार..?

नांदेड: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात राजकीय शिमगा सुरू असून वरचेवर चांगलाच रंग भरत आहे. काँग्रेसचा गड शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण जिल्ह्यातील सर्व जाती-धर्माची वेगळी बैठक घेऊन सोशल इंजिनियरिंग सुरू केले. तर दुसरीकडे भाजपाही काँग्रेसच्या गडाला पोखरून एक नवा 'प्रताप' घडविण्यासाठी बूथ पातळीपर्यंत काम सुरू केले आहे.
काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षानी 'वेट अँड वॉच' ची भूमिका घेतली आहे. एकमेकांचा उमेदवार पाहून आपला 'पत्ता' समोर कसा करता येईल याची वाट पाहत आहेत. तर काँग्रेसकडून अशोकराव चव्हाण की अमिता चव्हाण हे अद्याप स्पष्ट नाही व भाजपाकडून प्रतापराव पाटील चिखलीकर की अन्य कुणी याबाबत सध्या तरी गुप्तताच आहे. पण जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळचे कट्टर मित्र आज कट्टर विरोधक अशोकराव विरुद्ध प्रतापराव असाच सामना होईल.असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे शेवटच्या टप्प्यातच सोमवारी किंवा मंगळवारी हे चित्र स्पष्ट होणार आहे.

नांदेड मतदारसंघाचे डॉ . शंकरराव चव्हाण, व्यंकटराव देशमुख तरोडेकर, भाई केशवराव धोंडगे, सूर्यकांता पाटील, अशोक चहाण अशा दिग्गजांनी नेतृत्व केले आहे . त्याचबरोबर भास्करराव पाटील-खतगावकर यांनी तीन वेळा, तर शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण , देवराव कांबळे, व्यंकटराव देशमुख तरोडेकर या चौघांना दोनदा खासदार होण्याची संधी मिळाली आहे .
आतापर्यंत काँग्रेसचे सर्वाधिक खासदार झाले आहेत. १९७० मध्ये भाई केशवराव धोंडगे (शेतकरी कामगार पक्ष), १९८९ मध्ये हो , व्यंकटेश काब्दे ( जनता दल आणि २००४ मध्ये डी. बी . पाटील ( भाजप ) यांनाही खासदार होण्याची संधी नांदेडकरांनी दिली आहे . आतापर्यंत केशवराव धोंडगे (शेकाप), डॉ . व्यंकटेश काब्दे (जनता दल), डी. बी. पाटील (भाजप) वगळता इतर सर्व काँग्रेसचे खासदार आहेत.
जिल्ह्यात १९५२ पासून तीन वेळा वगळता चौदा वेळा काँग्रेसचाच खासदार निवडून आला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपात असा राजकीय सामना अवलंबून असला तरी वंचित बहुजन आघाडीनेही नांदेड मधूनच आपले रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे यावेळी वंचित बहुजन आघाडी त्याच तुलनेने लढत देऊ शकते. होळी व शिमग्याचा सण संपला तरी जिल्ह्यात चांगलाच राजकीय शिमगा रंगून 'धुळवड' साजरी होणार यात शंका नाही.

समाविष्ट विधानसभा मतदारसंघ....!
-------------------------
नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, भोकर, नायगाव, देगलूर आणि मुखेड ,

एकूण मतदार
------------------
एकूण: १७, ००, ९९१
पुरुष : ८, ८३, १३८
महिला : ८, १७, ७९५
इतर मतदार : ५८
नवमतदार : २ , ६३ , ३३७

आतापर्यंतचे खासदार
---------------------------
शंकरराव टेळकीकर व देवराव कांबळे (१९५२) हरिहरराव सोनुले व देवराव कांबळे (१९५७)
तुळशीदास जाधव (१९६२)
व्यंकटराव देशमुख तरोडेकर, (१९६७ व १९७१)
केशवराव धोंडगे (१९७७)
डॉ .शंकरराव चव्हाण (१९८६ व ८४)
अशोक चव्हाण (१९८७)
डॉ .व्यंकटेश काब्दे (१९८९)
सूर्यकांता पाटील (१९९१) गंगाधरराव देशमुख कुंटूरकर (१९९६)
भास्करराव पाटील खतगावकर (१९९८ , १९९९ , २००९)
डी . बी . पाटील (२००४) अशोक चव्हाण (२०१४)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.