नांदेड - शहरातील जुन्या नांदेड येथील सराफा व्यापारी रवींद्र चक्रवार यांच्या खून प्रकरणात इतवारा पोलिसांनी एकास अटक केले असून त्याची चौकशी केली जात आहे. अटक केलेला इसम हा सराफा व्यापारी चक्रवार यांच्या दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला होता.
शुक्रवारी रात्री सराफा भागात असलेल्या गुरुकृपा ज्वेलर्स या दुकानात काही अज्ञात व्यक्तींनी शिरून रवींद्र चक्रवार यांचा कैचीने भोसकून खून केला होता. मारेकऱ्यांनी सोने कापण्याच्या कैचीने चक्रवार यांच्या मानेवर वार केले होते. हा खून नेमका कशासाठी केला याचा तपास पोलीस करत आहेत. या हत्येमागचे कारण लूट होते की अन्य काही होते, याचाही छडा अद्याप लागला नाही. मारेकऱ्यांनी चक्रवार यांच्या लॉकरला हातही लावला नाही. त्यामुळे सदर प्रकार हा पूर्ववैमनस्यातून झाला की अन्य कोणत्या कारणावरून झाला याचा तपास केला जात आहे.
हेही वाचा - नांदेड : 'त्या' सराफा व्यापाऱ्याची हत्या पूर्ववैमनस्यातून?...
या तपासादरम्यान इतवारा पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने चक्रवार यांना शेवटचा फोन केला होता. तसेच तो घटनेच्या दिवशी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. त्यामुळे या इसमाची पोलीस कसून चौकशी करत आहे.
हेही वाचा - नांदेडमध्ये दरोडेखोरांनी कैचीने भोकसून ज्वेलर्स व्यापाऱ्याचा केला खून, दागिने घेऊन पसार