नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे नुकसान ( Heavy Rains in District ) झाले आहे. उसाची परिस्थिती बरी राहिली आहे. यात कापूस, सोयाबीन, तूर या पिकांना हेक्टरी 75 हजार रुपये मदत द्यावी. केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. सध्या केळीला भाव चांगला आहे. त्यामुळे फळबागांचा भाव लक्षात घेऊन त्यांना त्या पद्धतीने मदत दिली पाहिजे. केंद्र व राज्यात एकच सरकार आहे. त्यामुळे मदत देणे शक्य होईल. शासनाने एसडीआरएफचे नाॅम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना ( Help Farmers Immediately ) तत्काळ मदत करावी.
-
Many people have received ED notices. Investigative agencies, be it ED, CBI, IT or state agencies, all of them conduct investigations when they receive complaints. In Sanjay Raut's case it's happening repeatedly so only he can tell the exact reason behind it:NCP leader Ajit Pawar pic.twitter.com/Yi8s8QvZgA
— ANI (@ANI) July 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Many people have received ED notices. Investigative agencies, be it ED, CBI, IT or state agencies, all of them conduct investigations when they receive complaints. In Sanjay Raut's case it's happening repeatedly so only he can tell the exact reason behind it:NCP leader Ajit Pawar pic.twitter.com/Yi8s8QvZgA
— ANI (@ANI) July 31, 2022Many people have received ED notices. Investigative agencies, be it ED, CBI, IT or state agencies, all of them conduct investigations when they receive complaints. In Sanjay Raut's case it's happening repeatedly so only he can tell the exact reason behind it:NCP leader Ajit Pawar pic.twitter.com/Yi8s8QvZgA
— ANI (@ANI) July 31, 2022
ईडी कारवाईवर अजित पवारांची प्रतिक्रिया - अनेकांना ईडीच्या नोटिसा आल्या आहेत. तपास यंत्रणा, मग ते ईडी, सीबीआय, आयटी किंवा राज्य एजन्सी असोत, त्यांच्याकडे तक्रारी आल्यावर त्या सर्व तपास करतात. संजय राऊत यांच्या बाबतीत हे वारंवार घडत आहे त्यामुळे त्यामागील नेमके कारण तेच सांगू शकतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
100 टक्के कर्जमाफी दिली पाहिजे : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे पूर्णतः पीक गेले आहे, अशा 100% नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नांदेड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
मंत्रिमंडळाचा अजून विस्तार नाही : तसेच एक महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास तुम्हालाच त्याची मदत होईल. प्रत्येक गोष्टीसाठी सध्या मुख्यमंत्र्यांकडे जावे लागते. आज फडणवीस यांच्याकडे कुठलेच खाते नाही. सगळी खाती ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहेत, असेही पवार म्हणाले.
सरकारमध्ये झालेल्या मंजूर मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे होतेच ना : महाविकास आघाडीमध्ये जी काही विकासकामे मंजूर झाली, त्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे नव्हते का, त्यांनी तेव्हा कधी विरोध केला नाही. विकासकामांना मंजुरी दिली आता राज्याचे प्रमुख झाल्यावर विरोध करीत आहेत. तेव्हा ज्या गोष्टीला मान्यता दिली, आता त्याला विरोध करीत आहेत. काय दुर्दैव आहे, असेसुद्धा अजित पवार म्हणाले. राज्याचे प्रमुख तुम्ही विकासकामे करण्यासाठी झाला आहेत ना, असे प्रतिप्रश्नदेखील एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.