ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

author img

By

Published : May 29, 2020, 9:16 PM IST

जिल्ह्यातील सोयाबीन एक महत्त्वाचे पीक आहे. सध्या कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. शेती व्यवसायाला याचा जबर फटका बसत आहे. शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बियाण्याची खरेदी, खत नियोजन, हवामान अंदाज व कृषी तज्ञांचे मार्गदर्शन या सर्वांसाठी शेतकऱ्यांना अडचण येत आहे. या सर्वांचा विचार करून अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आले होते.

Agriculture experts guide soybean farmers
शेतकऱ्यांना ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे कृषी तज्ञांचे मार्गदर्शन

नांदेड- शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योग याची माहिती मिळावी, यासाठी अनेक कृषी तज्ज्ञांनी ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील सोयाबीन एक महत्त्वाचे पीक आहे. सध्या कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. शेती व्यवसायाला याचा जबर फटका बसत आहे. शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बियाण्याची खरेदी, खत नियोजन, हवामान अंदाज व कृषी तज्ञांचे मार्गदर्शन या सर्वांसाठी शेतकऱ्यांना अडचण येत आहे. या सर्वांचा विचार करून अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, उमरी धर्माबाद, हदगाव, देगलूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला.

आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने बियाण्याची खरेदी, खत नियोजन, हवामान अंदाज व कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन या सर्वांसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. याचाच विचार करून अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या पुढाकाराने भारतीय सोयाबीन अनुसंधान संस्थान इंदोर, (मध्यप्रदेश), वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, कृषी विज्ञान केंद्र पोखरणी,नांदेड, जिल्हा कृषी विभाग नांदेड व रिलायन्स फाउंडेशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. यावेळी सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगावर कृषी तज्ज्ञांनी ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

दीड तासाच्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घरी व शेतात बसून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. डॉ. आर. बी. पाटील यांनी कार्यक्रम आयोजनाचा उद्देश सांगून प्रस्तावना केली. तर डॉ.व्ही.एस. भाटिया यांनी सोयाबीन पीक हे एक महत्त्वाचे पीक असून पिकाला जागतिक मागणी आहे. लागवडीनंतर शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी खत, कीटकनाशक आणि सिंचन व्यवस्थापनासाठी कृषी तज्ज्ञाकडून मार्गदर्शन घ्यावे असे सांगितले. या ऑडीओ चर्चासत्रात जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी जिल्ह्यात सोयाबीन पेरणी क्षेत्र संदर्भात माहिती दिली. यावर्षी नांदेड जिल्ह्यात 3 लाख 95 हजार हेक्टर सोयाबीन पेरणीचे लक्ष नियोजित केले आहे. गेल्यावर्षी तीन लाख 70 हजार हेक्टर सोयाबीनची पेरणी झाली होती. गेल्या तीन ते चार वर्षापासून कपाशीचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झालेली दिसत आहे, असे त्यांनी सांगितले. दरवर्षी सोयाबीन नवीन वाणाची खरेदी करण्याची आवश्यकता नसते. एकदा नवीन वाण घेतले तर ते पुढील तीन वर्षे वापरता येईल असा शेतकऱ्यांना सल्ला दिला. सोयाबीनच्या नवीन वाणाबद्दल सुद्धा माहिती दिली. सोयाबीनची लागवड ही बीबीएफ तंत्रज्ञान अवलंब करावा, असेही त्यांनी आवाहन केले. 80 ते 100 मि.मी. पाऊस झाल्याशिवाय सोयाबीन पेरणीची लागवड करू नये, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. देविकांत देशमुख यांनी सोयाबीन बीजप्रक्रिया, सोयाबीन उगवण क्षमता चाचणी याबद्दल शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली व मार्गदर्शन केले .डॉ. एस. पी. मेहत्रे यांनी मान्सून योग्य वेळेवर येणार असून सोयाबीन लागवड सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली व सखोल मार्गदर्शन सुद्धा केले.डॉ. डी. एस. कंकाळ यांनी सोयाबीन पिकासंदर्भात खत व्यवस्थापनाबद्दल सखोल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावर्षी रासायनिक खताचा पुरवठा काही प्रमाणात कमी पडण्याची शक्यता व्यक्त केली. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेणखताचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला जैविक खताचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

नरेंद्र चव्हाण यांनी सोयाबीन प्रक्रिया उद्योगाबद्दल अतिशय सखोल असे मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी प्रत्येक गावात शेतकरी गट स्थापन करून सोया मिल्क, सोया प्रोटीन, सोया पनीर यांचे उत्पादन घेण्याचा सल्ला दिला. डॉ. एस. एस. वडजे यांनी सुद्धा सोयाबीन प्रक्रिया उद्योगाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सोयाबीन पिकावर आधारित उत्पादन हे निश्चितच शेतकऱ्यांना आर्थिक फायद्याचे ठरेल असेही ते म्हणाले. डॉ. रावसाहेब शेंदारकर यांनी शेतकत्यांची बियाणांबद्दल होत असलेली फसवणूक ह्या बद्दल कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे असे सांगितले. प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना कसे मिळतील ह्या करिता प्रयत्न करावे असे ते म्हणाले. प्राचार्य डॉ.के. के. पाटील यांनी अध्यक्षीय समारोपात शेती हा व्यवसाय कसा होईल यासंदर्भात मत मांडले. आधुनिक शेतीचे धडे व शेती संदर्भात प्रशिक्षण परिसरातील विद्यार्थ्यांना देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय सोयाबीन अनुसंधान संस्थान, इंदोर, मध्यप्रदेशचे संचालक डॉ.व्ही.एस.भाटिया, नांदेड कृषी विभागाचे कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे, सोयाबीन पैदासकार डॉ. एस. पी. मेहत्रे, खत व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. डी. एस. कंनकाळ, शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, उद्योजक नरेंद्र चव्हाण, उद्योजक, डॉ. रावसाहेब शेंदारकर, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. एस. वडजे, प्राचार्य डॉ. के. के. पाटील, आयोजक व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर.बी.पाटील, रिलायन्स फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक प्रफुल बनसोड, दशरथ वाळवंटे व नांदेड जिल्ह्यातील शेतकरी या विशेष ऑडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.