नांदेड - शहरापासून जवळच असलेल्या वाघी येथील दलितवस्तीत मागील अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या वाघी येथील ग्रामस्थांनी आज (मंगळवार) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमदार डी. पी. सावंत यांना घेराव घालत पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली.
शहरापासून जवळच असलेल्या वाघी येथील दलितवस्तीमध्ये मागील अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी रात्रंदिवस भटकंती करावी लागत आहे. त्यातच गावातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. याविषयी ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय व गटविकास अधिकार्यांकडे अनेकवेळा तक्रारी केल्या, परंतु या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याने वाघी येथील ग्रामस्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
यावेळी त्यांना आमदार डी. पी. सावंत समोर दिसताच वाघी ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालत पाण्याचा प्रश्न व अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली.
आमदार डी. पी. सावंत यांनी यावेळी वाघी येथील दलितवस्तीतील समस्या सोडवण्याचे आश्वासन देत संबंधित अधिकारी व सरपंचांना याबाबत माहिती देत सदरील प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश दिले. यावेळी वाघी येथील अजय हनमंते, सुमेध येरेकर, महेश हनमंते, स्वप्नील हनमंते, दिनेश मोरे, सिध्दार्थ हनमंते, शैलेश मोरे, मंगेश हनमंते, रवी वाढवे, अमर हनमंते, धनंजय हनमंते, रवी हनमंते, अनिल पिंपळे, निलाबाई घुले, शांताबाई हनमंते, सागरबाई हनमंते, छायाबाई हनमंते, सविताबाई हनमंते, शशिकलाबाई हनमंते यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.