नांदेड: उदगीर रस्त्यावरील शास्त्रीनगरमध्ये श्रीपतराव रामजी पाटील यांच्या घरावर दरोडा पडल्याची घटना घडली आहेती. यावेळी त्यांची पत्नी चंद्रकलाबाई श्रीपतराव पाटील यांचे पाय व तोंडास कपड्याने बांधून त्यांचा खून करण्यात आला. चोरट्यांनी सोन्या चांदीचे ३ लाख ८९ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी देगलूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांची टीम व स्थानिक गुन्हे शाखा, मुखेड, मरखेल, मुक्रामाबाद पोलिसांचे शोधपथक तयार करण्यात आले होते.
सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक बाबीचे विश्लेषन: कर्नाटक राज्यातील वडगाव औराद, संतपुर येथील जवळपास ९६ तासाचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबीचे विश्लेषण केले. या पथकांना पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, पोलीस उपनिरिक्षक दळवी, ओढणे, सिटीकर, सायबर पोलीस स्टेशन यांनी महत्वपुर्ण तांत्रिक साहाय्य पुरविले. रवि मुंढे मोरे, पोलीस नाईक सुनिल पत्रे, यांना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे सीसीटीव्हीमधील आरोपींची ओळख पटवून गुन्ह्यात सहभागी असणारे गुन्हेगार निष्पन्न केले आहे.
गुन्हयाचे नियोजन करून घराची रेकी: मृत चंद्रकलाबाई श्रीपतराव पाटील यांच्याबाबत त्यांचा भाचा शहाजी मरतळे याने अन्य आरोपींना माहिती दिली. त्यानंतर आरोपींनी कट केला. गुन्हयाचे नियोजन करून घराची रेकी केली. मृत चंद्रकलाबई श्रीपतराव पाटील यांचा खून करून त्यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागीने व मोबाईल असा मुद्देमाल जबरीने चोरून घेवुन गेले असल्याचे कबुल केले आहे. सदर गुन्हयात आरोपी विठ्ठल व्यंकट बोईनवाड (रा वसुर ता. मुखेड), बालाजी पंढरी सोनकांबळे (रा. मंग्याळ, ता. मुखेड), गौतम दशरथ शिंदे (रा. वसुर ता. मुखेड), शेषेराव माधवराव बोईनवाड (रा. वसुर ता. मुखेड), शहाजी श्रीराम मोरतळे (रा. मोरतळवाडी ता. उदगीर) यांना अटक करण्यात आली, असे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलिसांची तत्काळ कारवाई : पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व सहायक पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. सोमवार दि. 23 जानेवारीच्या रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात तीन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला होता. एक चोर श्रीपतराव पाटील यांच्या तोंडावर पाय देऊन त्यांचे हातपाय बांधून चाकूचा धाक देत उभा राहिला होता. बाकीच्या दोन चोरांनी चंद्रकलाबाई आरडा-ओरड करू नये म्हणून तिचे तोंड व पाय कापडाने बांधले होते. लुटालूट करीत कपाटात ठेवलेले 5 तोळे सोन्याचे कडे, 70 तोळे चांदीचे वाळे काढून घेतले होता. चंद्रकलाबाईच्या अंगावरील एका तोळ्याचे सोन्याचे मनी, दीड तोळ्याची बोरमाळ, 5 तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या असे एकूण साडेबारा तोळे सोन्याचे दागिने व 70 तोळ्याचे वाळे असा 3 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
हेही वाचा: Drug Smugglers Arrested : बीपीटी कॉलनी परिसरातून दोन ड्रग्ज तस्करांना अटक