ETV Bharat / state

MP Pratap Patil Chikhalikar : प्रशासन कुठल्याही कार्यक्रमात राजशिष्टाचार पाळत नाही; खासदारांची लोकसभा अध्यक्षाकडे गंभीर तक्रार - नांदेड खासदारांची तक्रार

नांदेडमध्ये होणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यक्रमात खासदार प्रताप पाटील यांना डावलले जात आहे. कुठल्याही शासकिय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर खासदार चिखलीकरांचे नाव टाकले जात नाही. शासकीय उद्घाटनाच्या ठिकाणी कोनशिलेवर नाव टाकले जात नाही. खासदार म्हणून नाव टाकणे राजशिष्टाचार असताना चिखलीकरांना डावलले जात आहे. अशी लेखी तक्रार खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी लोकसभा अध्यक्षांकडे दिली आहे.

MP Pratap Patil Chikhalikar
खासदार प्रताप पाटील चिखलीकर
author img

By

Published : Jun 3, 2022, 5:53 PM IST

नांदेड - प्रशासन कुठल्याही कार्यक्रमात राजशिष्टाचार पाळत नसल्याची गंभीर तक्रार नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी थेट लोकसभा अध्यक्षांकडे केली ( MP Pratap Patil Chikhalikar complaint to Lok Sabha Speaker ) आहे. नांदेडचे प्रशासन कुणाचे तरी वैयक्तिक नोकर असल्याप्रमाणे वागत असल्याची टीका चिखलीकरांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव न घेता केली. ( Pratap Patil On Ashok Chavan )

चिखलीकरांची लोकसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार - नांदेडमध्ये होणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यक्रमात खासदार प्रताप पाटील यांना डावलले जात आहे. कुठल्याही शासकिय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर खासदार चिखलीकरांचे नाव टाकले जात नाही. शासकीय उद्घाटनाच्या ठिकाणी कोनशिलेवर नाव टाकले जात नाही. खासदार म्हणून नाव टाकणे राजशिष्टाचार असताना चिखलीकरांना डावलले जात आहे. त्यामुळे खासदार चिखलीकरानी थेट लोकसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार केली.

हेही वाचा - Pravin Darekar About Rajya Sabha Seat : यावेळीही तिसरी जागा भाजपाच निवडून येणार; प्रवीण दरेकरांचा दावा

लोकसभा सचिवांनी राज्य सरकारकडून माहिती मागितली - आपल्याला नांदेडच्या जनतेने निवडून खासदार केले. पण जिल्हा प्रशासन अवहेलना करत असल्याने संसदेच्या हक्कभंग समितीकडे तक्रार करण्याचा इशारा खासदार चिखलीकरानी दिला. या तक्रारीची लोकसभा सचिवांनी गंभीर दखल घेत राज्य सरकारकडून माहिती मागवल्याची माहिती आहे.

हेही वाचा - राष्ट्रपती, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी कानपूरमध्ये दोन समाजात दगडफेक; तणावाचे वातावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.