ETV Bharat / state

धर्माबाद बाललैंगिक प्रकरणातील 'तो' आरोपी अखेर जेरबंद

सदर आरोपीचा शोध धर्माबाद पोलिसांनी अनेकवेळा मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन घेतला. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता.

धर्माबाद बाललैंगिक प्रकरणातील 'तो' आरोपी अखेर जेरबंद
author img

By

Published : Aug 12, 2019, 11:35 AM IST

नांदेड - धर्माबाद बाल लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर फरार झालेल्या आरोपीस धर्माबाद पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपीविरोधात धर्माबाद पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यानंतर आरोपी फरार झाला होता.

आनंद कोडिंवा लांडगे (वय - 26 रा. आटाळा ता. धर्माबाद जि. नांदेड), असे आरोपीचे नाव आहे. सदर आरोपीचा शोध धर्माबाद पोलिसांनी अनेकवेळा मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन घेतला. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता.

सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांनी पोलिसांचे एक पथक बनवले होते. या पथकातील नागमवार यांना माहिती मिळाली की, सदर आरोपी हा निजामाबादला येणार आहे. त्यानुसार 11 ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप गायकवाड व सहकारी निजामाबादला गेले आणि तेथे जाऊन आरोपीस पकडले. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भागवत जायभाये, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, रेणके, कानगुले, नागमवार यांच्या पथकाने केली आहे.

Intro:नांदेड - आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला बाललैंगिक प्रकरणातील आरोपी अखेर जेरबंद.

नांदेड : धर्माबाद बाल लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर फरार झालेल्या आरोपीस धर्माबाद पोलिसांनी केले आहे.Body:
धर्माबाद पोलीस ठाण्यात गु.र.नं.२०४/२०१८ कलम ३७६ (२) (१),सह कलम ४,५ (क), ६ बालकाचे
लैगिंक अत्याचारा पासुन संरक्षण कायदा (पोक्सो) दाखल आहे.या प्रकरणानंतर आरोपी आनंद कोडिंवा
लांडगे-२६ रा.आटाळा ता.धर्माबाद जि.नांदेड हा फरार होता. सदर आरोपीचा शोध धर्माबाद पोलिसांनी
अनेकवेळा मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता तो पोलिसांना गुंगारा देत होता.Conclusion:
सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांनी पोलीस उपनिरीक्षक
रत्नदीप गायकवाड, रेणके, कानगुले,नागमवार यांचे पथक तयार केले होते.या पथकातील नागमवार यांना
माहिती मिळाली की,सदर आरोपी हा निजामाबादला येणार आहे. त्यानुसार ११ ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप गायकवाड व सहकारी निजामाबादला गेले आणि तेथे जाऊन आरोपीस पकडले.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक विजय पवार,
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भागवत जायभाये,
पोलीस उपनिरीक्षक गायकवाड,रेणके,कानगुले, नागमवार यांच्या पथकाने केली आहे.
_____________________________________
FTP feed over
Ned Dharmabad police station vis
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.