नांदेड - बिलोली शहरातील नवी आबादी येथे वास्तव्यास असलेल्या मुकबधीर तरुणीवर जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे सामुहिक बलात्कार केल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती. तसेच त्या युवतीची दगडाने ठेचून हत्या केली होती. याप्ररकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. तर तिसरा आरोपी फरार होता. या फरार आरोपीला बिलोली पोलिसांनी तेलंगणातील अरमूर येथून अटक केली आहे. शेख नजीर शेख उस्मान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कठोर कार्यवाही करण्याची नातेवाईकांची मागणी -
या प्रकरणातील दोन आरोपींना बिलोली पोलिसांनी अटक केली होती. परंतु या घटनेतील मुख्य आरोपी शेख नजीर शेख उस्मान हा फरार होता. तो तेलंगणातील अरमूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे फरार आरोपीला पकडण्यासाठी सहा टीम तयार करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी त्याला तेलंगणातील अरमूर येथून अटक केली. या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी तरुणीच्या नातेवाईकांनी केली आहे.