ETV Bharat / state

माहूर पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी फरार! बलात्कार प्रकरणात झाली होती अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेला २१ वर्षीय आरोपी माहूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे. आरोपीला २४ नोव्हेंबर रोजी सहा बाजता माहूर पोलीसांनी अनमाळ येथून अटक केली होती. आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार होते.

Accused arrested in rape case
बलात्कार प्रकरणातील आरोपी फरार
author img

By

Published : Nov 25, 2020, 6:58 PM IST

नांदेड - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेला २१ वर्षीय आरोपी माहूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे. ही घटना २५ रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. शौचालयात पाणी नसल्याने नैसर्गिक विधीसाठी पोलिसांनी त्याला कोठडी बाहेर काढले असता त्याने पळ काढल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. करण रामराव खूपसे असे फरार आरोपीचे नाव आहे.

माहूर तालुक्यातील अनमाळ येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी करण रामराव खूपसे (२१) विरुद्ध पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून भादंवि कलम ३६३, ३६६(ज), ३७६ (अ), (न) पोस्को कायद्याप्रमाणे मागील तीन महिन्यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके हे करीत होते, तेव्हा पासून आरोपी फरार होता.

आरोपीला २४ नोव्हेंबर रोजी सहा बाजता माहूर पोलीसांनी अनमाळ येथून अटक केली होती. आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार होते. त्या पूर्वीच आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. या वेळी ठाणे अमालादार गंगाधर कमाटे, रवी कोंंडमवार कर्तव्यावर हजर होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या बातमीला दुजोरा दिला असून पसार झालेल्या आरोपीविसूद्ध कलम २२४ प्रमाणे आणखी एक गुन्हा दखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराची दखल वरिष्ठांनी घेतली असून लवकरच दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.