नांदेड - लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला भोकर पोलिसांनी शनिवारी सकाळी तेलंगणात अटक केली. अटक केलेल्या आरोपीचे नाव हनमंतू नागोराव हाळे असून त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - 'तमाशामध्ये प्रेक्षकांची हुल्लडबाजी, त्यातच पोलीसही पैसे मागतात; मग लोककला जिवंत कशी राहणार?'
शहरातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून २४ डिसेंबरला डौर येथील हनमंतू नागोराव हाळे या तरुणाने पळवून नेवून तिच्यावर सतत बळजबरीने शारीरीक संबध ठेवले. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून २ जानेवारीला आरोपीविरूद्ध भोकर पोलिसात पोक्सो, अॅट्रॉसिटी आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
हेही वाचा - डोळ्यांवर पट्टी बांधूनही 'तीला' येते वाचता!
दरम्यान फरार असलेला आरोपी तेलंगणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उप अधीक्षक बी. मुदीराज, पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार नागोराव आत्राम, कृष्णा तलवारे, प्रकाश श्रीराम यांच्या पथकाने ४ जानेवारीला सकाळी तेलंगणातील जकरामपल्ली (जि.निजामाबाद) आरोपीला अटक केली. आरोपीला भोकरच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.