ETV Bharat / state

पोलिसांना गुगांरा देऊन आरोपीचे रुग्णालयातून पलायन, दोन पोलीस निलंबित

शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. राजींदरसिंघ जोगिंदरसिंघ (२२) असे या आरोपीचे नाव आहे.

NANDED
आरोपी राजींदरसिंघ जोगिंदरसिंघ
author img

By

Published : Dec 27, 2019, 9:31 AM IST

Updated : Dec 27, 2019, 3:00 PM IST

नांदेड - शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. राजींदरसिंघ जोगिंदरसिंघ (२२) असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

पोलिसांना गुगांरा देऊन आरोपीचे रुग्णालयातून पलायन

हेही वाचा - आदिवासी जिल्ह्यात न्युमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी न्युमोकोकल लसीकरणाचा खर्च सिद्धिविनायक न्यास उचलणार

राजींदरसिंघ याला अफिम बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. न्यायालयाच्या आदेशाने त्याला वजिराबाद येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १९ डिसेंबरला रात्री ९ वाजता त्याने बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला होता. आरोपी राजींदरसिंघ याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वजिराबाद ठाण्यातील हवालदार संजयकुमार पवार व सुरेश वाघमारे यांना तैनात करण्यात आले होते. मात्र, आरोपीने कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन पळ काढला. अद्यापही आरोपी पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे वजिराबादचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी पोलीस कर्मचारी पवार व वाघमारे यांचा कसूरी अहवाल पोलीस उपअधीक्षक अभिजीत फस्के यांच्याकडे सादर केला.

हा अहवाल प्राप्त होताच पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत हवालदार संजयकुमार पवार व सुरेश वाघमारे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. अद्यापही फरार आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढण्यात यंत्रणेला यश आले नाही.

Intro:नांदेड : रुग्णालयातील आरोपीचे पोलिसांना गुंगारा देऊन पलायन, दोन पोलीस कर्मचारी निलंबीत.

नांदेड : शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेला आरोपी राजींदरसिंघ जोगिंदरसिंघ
(२२) हा पोलिसांना गुंगारा देवून पसार झाला होता. या आरोपीचा शोध घेण्यात यंत्रणेला अद्याप यश आले नाही.या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे.Body:राजींदरसिंघ यास अफिम बाळगल्याप्रकरणी. पोलिसांनी ताब्यात घेतले होते. न्यायालयाच्या
आदेशाने त्यास वजिराबाद येथील पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. दरम्यान प्रकृती बिघडल्याने
त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १९ रोजी रात्री ९ वाजता त्याने बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देवून पळ काढला होता.आरोपी राजींदरसिंघ याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वजिराबाद ठाण्यातील हवालदार संजयकुमार पवार व सुरेश वाघमारे यांना तैनात करण्यात आले होते. मात्र आरोपीने उपरोक्त कर्मचाऱ्यांना गुंगारा देवून पळ काढला. अद्यापही आरोपी पोलिसांना सापडला नसल्याने वजिराबादचे पोलिस निरीक्षक संदीप
शिवले यांनी पोलिस कर्मचारी पवार व वाघमारे यांचा कसुरी अहवाल पोलिस उपअधीक्षक अभिजीत
फस्के यांच्याकडे सादर केला.Conclusion:हा अहवाल प्राप्त होताच पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत हवालदार संजयकुमार पवार व सुरेश वाघमारे यांच्या निलंबनाचे आदेश पारीत केले. अद्यापही फरार आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढण्यात यंत्रणेला यश आले नाही.
Last Updated : Dec 27, 2019, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.