ETV Bharat / state

Nanded Accident: एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; ९ प्रवाशी जखमी

author img

By

Published : Feb 4, 2023, 12:36 PM IST

मुखेड लातूर राज्य रस्त्यावरील मुखेड नजीक असलेल्या दबडे शिरूर पाटी जवळ बस व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एसटी चालक, वाहक यांच्यासह बसमधील दोन प्रवासी व इतर दोन असे एकूण सहा प्रवासी जखमी झाले. दरम्यान कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे जखमी प्रवाशांनी सांगितले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. तर कंटेनर चालक फरार झाला आहे.

Nanded Accident
मुखेड-लातूर महामार्गावरील घटना

नांदेड : मुखेड आगाराची बस क्रमांक एम.एच. 20 बी.एल. 2228 ही कामजळगा या गावावरून प्रवाशांना घेऊन मुखेडकडे येत होती. तर कंटेनर क्रमांक जी. जे. 05 बी.एक्स 7642 हा मुखेडकडून लातूरला जात होता. कंटेनर चालकाने दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करण्याच्या नादात मुखेडकडे येणाऱ्या एसटीला दबडे शिरूर पाटील येथे समोरासमोर धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती की एसटीचा समोरचा भाग चक्काचूर झाला आहे.

पादचार्‍याला दिली धडक : या घटनेत एसटी चालक रामदास कबीर व ४० वाहक, एम एन पांढरे, एसटी मधील प्रवासी रघुनाथ मस्कले वय ५०, पुष्पाबाई बनसोडे वय ५२, हे जखमी झाले आहेत. दरम्यान कंटेनर चालकाने या अपघाताआधी रोडच्या कडेला थांबलेल्या बालाजी गणपतराव हाके वय ६५ या पादचार्‍याला धडक दिली. यात हाके हे गंभीर जखमी झाले. दरम्यान कंटेनरमध्ये बसलेले प्रवासी देवीदास राठोड वय ५५ राहणार सन्मुखवाडी हे प्रवासी ही गंभीर जखमी झाले.

जखमींना रुग्णालयात दाखल : ही घटना समजतात घटनास्थळी मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, मुखेडचे पोलीस पाटील माधव टाकळे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल माणिकराव घोगरे, महामंडळाचे कर्मचारी बालाजी नगरे, एस.टी सेनेचे बालाजी रिंदकवाले, नागोराव शेटवाड, उत्तम पवित्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना एसटीमधून बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. एसटी चालक रामदास कबीर यांचे दोन्ही पाय अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तब्बल अर्धा तास लागला.

कंटेनर चालक फरार : गंभीर जखमी असलेले एसटी चालक रामदास कबीर यांचे दोन्ही पाय मोडले आहेत.त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान इतर रुग्णावर मुखेड येथे उपचार सुरू आहेत. या अपघातात जखमी झालेल्या रुग्णावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधाकर तहाडे, डॉक्टर नरेंद्र गादेकर यांनी उपचार केले. दरम्यान उपजिल्हा रुग्णालय येथे धाव घेऊन आगारप्रमुख रा.सू. बोधे, सुशील पत्की, बजरंग कल्याणी, भगवान रोडगे, बालाजी नगरे,उपसरपंच शिवाजी राठोड , अ‍ॅड. हाके, बालाजी शिंदे बिल्लाळीकर, विठ्ठलराव घोगरे, प्रताप कोल्हे, नागेश लोखंडे, उल्हास ईमडे यांनी जखमींंना मदत केली. दरम्यान ही घटना घडताच मद्यप्राशन केलेल्या कंटेनर चालक फरार झाला आहे.

हेही वाचा: Pune Accident बेल्हा जेजरी मार्गावर भीषण अपघात माय लेकांसह मित्राचाही जागीच मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.