नांदेड: २२ वर्षीय पीडित तरुणी ही मूळ अमरावती येथील रहिवासी आहे. मागील काही वर्षांपासून ती छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास होती. या दरम्यान ती एका कंपनीमध्ये कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम देखील करत होती. याच कंपनीमध्ये नांदेड शहरातील सराफा भागात राहणाऱ्या अब्दुल्ला सईद हा देखील काम करायचा. यामुळे त्या दोघात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपी हा लग्नाचे आमिष दाखवून त्या तरुणीवर अत्याचार करू लागला. सलग तीन वर्षे आरोपीने पीडित तरुणीवर अत्याचार केला. एवढेच नाही तर आरोपीने पीडित तरुणीला हैदराबादला नेले होते.
अखेर तरुणीची तक्रार: या काळात पीडितेने अनेकवेळा तरुणाकडे लग्नाची मागणी केली. मात्र, तो नेहमीच तिला टाळायचा. परीक्षा देण्यासाठी नांदेडला आलेल्या तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे समजले आणि तिने थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून अब्दुल्ला सईद विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात देखील घेतले आहे.
प्रेमापोटी नांदेडमध्ये अॅडमिशन: प्रेमापोटी कोण काय करेल याचा काही नेम नसतो. याचाच प्रत्यय पीडित तरुणी बाबत आला आहे. पीडित तरुणीने आपला प्रियकर नांदेड येथे राहत असल्याने तिने नांदेडमध्ये मुक्त विद्यापीठात एम. कॉम.साठी प्रवेश घेतला होता. ती मागील दोन वर्षांपासून नांदेडमध्ये शिक्षण घेत आहे. परीक्षेच्या वेळी ती नांदेडला राहत होती. सध्या ती एम. कॉम.च्या द्वितीय वर्षाची परीक्षा देत आहे. परीक्षेच्या तयारी दरम्यान आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला, असे पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा:
- Meera Road Murder: सरस्वती वैद्यच्या बहिणींना 'ते' फोटो पाहून अश्रू अनावर, कठोर शिक्षेची पोलिसांकडे केली मागणी
- Conversion Through Gaming App: ठाणे न्यायालयाकडून आरोपी शाहनवाझ खानला तीन दिवसाची ट्रान्झिट रिमांड
- Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरण; गौतम नवलखाच्या जामीन अर्जावर न्यायालयाने बजावली एनआयएला नोटीस