ETV Bharat / state

Caste Validity Certificate: जात प्रमाणपत्र नाकारल्याने शेकडो आदिवासींनी हिंदू देवतांना तहसिलदारांकडे केले सुपूर्द....

author img

By

Published : Jan 5, 2023, 7:19 PM IST

Caste Validity Certificate:हिंदू देववतांची पूजा करुन (Caste Validity Certificate) आम्हाला एवढी मोठी शिक्षा मिळत असल्याची (hindu gods goddesses by tribal ) भावना यावेळी आंदोलनकांनी केली. त्यानंतर हिंदू देव देवतांचे फोटो, मूर्ती तहसीलदारांकडे सोपवण्यात आले

Caste Validity Certificate
आदिवासींनी हिंदू देवतांना तहसिलदारांकडे केले सुपूर्द

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील मयुरी पुंजरवाड ही आदिवासी कोळी समजाची विद्यार्थिनी एमबीबीएस झाली आहे. (Caste Validity Certificate) पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी तिने संभाजीनगरच्या जात वैधता पडताळणी समितीकडे अर्ज दिला होता. (hindu gods goddesses by tribal )समितीने वैधता तपासणी करत जात वैधता नाकारली. (rejection of caste validity certificate ) अर्जदार मयुरी ने महादेव आणि खंडोबाची पूजा केल्या जात असल्याचे सादर केले आहे. (abandonment of hindu gods goddesses) महादेव आणि खंडोबाची पूजा साधारणतः हिंदू धर्मात केली जाते. तसेच अर्जदाराची विवाह पद्धाती हिंदू प्रमाणे असल्याची सबब देत जात पडताळणी समितीने वैधता नाकारली.

आयटीआय चौकात सभा: या निकालानंतर आदिवासी कोळी समाज बांधव आक्रमक झाले आहे. (abandonment of hindu gods goddesses) आज नांदेडमध्ये शेकडो आदिवासी महिला आणि बांधवांनी देव सोबत घेत देव देवतांचा त्याग करण्यासाठी आंदोलन केले आहे. मोर्चाला परवानगी न दिल्याने आदिवासी कोळी बांधवांनी आयटीआय चौकात सभा घेत, तहसीलदार आंबेकर यांच्याकडे आपल्या देव देवता सुपूर्द केल्या आहेत. शेकडो महिला आणि पुरुषांनी आपल्या देव देवता तहसीलदारांकडे देत देव देवतांचा त्याग केला. हिंदू देव देवतांची पूजा केल्याने जर जात वैधता नाकारली जात असेल, तर अश्या हिंदू देव देवतांचा आम्ही त्याग करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.

लग्न हिंदू संस्कृती प्रमाणे लावणार नाही: हिंदू देवदेवतांची पूजा करता म्हणून जातीचे वैधता प्रमाणपत्र नाकारल्याने नांदेडमध्ये महादेव कोळी समाजाने देव देवतांचा त्याग केलाय, शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार किरण अंबेकर यांनी आंदोलन स्थळी येत देवी देवतांच्या प्रतिमा स्वीकारल्या. यावेळी शेकडोंच्या संख्येने आलेल्या महादेव कोळी समाजाच्या नागरिकांनी देव देवतांच्या प्रतिमा तहसीलदाराकडे सुपूर्द केल्या आहेत.

जातीचे वैधता प्रमाणपत्र नाकारले: जात वैधता पडताळणी समितीने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मयुरी पुंजरवाड ला हिंदू देवतांची पूजा करता म्हणून जातीचे वैधता प्रमाणपत्र नाकारले होते. त्याच मयुरीच्या कुटुंबापासून देव-देवतांचा हा त्याग महादेव कोळी समाजाने केलाय. यापुढे आपण हिंदू धर्माच्या कोणत्याच चालीरीती पाळणार नसल्याचे मयुरीच्या वडिलांसह महादेव कोळी समाजाने जाहीर केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.