ETV Bharat / state

Nanded Crime भावांना फसवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्तीचा स्वत:वर गोळीबार, वाचा कुठे घडले हे प्रकरण

दोन भावांना अडकवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्तीने नांदेड येथील बाफना पुलावर स्वत:वर मित्रांकडून गोळीबार करुन घेतला. मात्र हा गोळीबार परभणी येथील रहीम खान आणि त्याच्या भावाने केल्याचा बनाव केल्याची घटना सोमवारी घडली होती. मात्र पोलिसांनी योग्य तपास करुन काँग्रेस कार्यकर्तीचे बिंग फोडले. सविता गायकवाड असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या काँग्रेस कार्यकर्तीचे नाव आहे.

Congress worker shot herself At Nanded
पकडण्यात आलेले आरोपी
author img

By

Published : Jan 12, 2023, 3:04 PM IST

Updated : Jan 12, 2023, 3:20 PM IST

अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिलाष कुमार

नांदेड - दोन भावांना अडकवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्तीने स्वत:वर गोळीबार करुन घेतल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्तीसह तिच्या साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता गायकवाड असे त्या गुन्हा दाखल करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्तीचे नाव आहे. त्यामुळे तक्रारदार असलेली काँग्रेस कार्यकर्तीच आरोपी असल्याचे उघड झाले आहे. गोळीबार केल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजता नांदेड येथील ओव्हरब्रीजवर घडली होती.

काँग्रेस कार्यकर्तीवर आयशर चोरी प्रकरणात गुन्हा काँग्रेस कार्यकर्त्या सविता गायकवाड आणि आतिक खान यांच्या विरोधात सहा महिन्यांपूर्वी भोकर पोलीस ठाण्यात आयशर चोरी प्रकरणात गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणात परभणी येथील रहीम खान हे साक्षीदार होते. या घटनेचा राग मनात धरून ६ जानेवारीला सविता गायकवाड आणि फैसल हे खासगी वाहनाने रात्री परभणीला गेले. तिथे रहीम खान आणि सविता गायकवाड यांच्यात वाद झाला. त्यानंतर रहीम खान यांनी परभणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून सविता गायकवाड विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे या गुन्ह्याबद्दल धडा शिकवण्यासाठी खोट्या गुन्ह्याचा कट रचण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत रहीम खान आणि त्याच्या भावाला अडकवण्याचा सविता गायकवाडने चंग बांधला होता.

साथीदारांच्या मदतीने रचला गोळीबाराचा कट सविता गायकवाडने इतर साथीदारांच्या मदतीने रहिम खानला अटक करण्यासाठी कट रचला होता. त्यानुसार सोमवारी रात्री आपल्या साथीदाराकडूनच तिने स्वत:वर गोळीबार करुन घेतला. रहीम खान आणि जफर खान या दोघा भावांनी हल्ला केल्याचा बनाव सविता गायकवाडने रचला. परंतु सुरुवातीपासूनच पोलिसांना या गोळीबाराच्या घटनेबाबत संशय होता. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे उलट्या दिशेने फिरविली अन् सविता गायकवाड हिचे बिंग फुटले. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अभिलाष कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, सहायक निरीक्षक पांडुरंग माने, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पद्मा कांबळे, तानाजी येळगे, विलास कदम, मोतीराम पवार, महेश बडगू, राजू सिटीकर, गंगाधर घुगे, मारोती मुंडे, दादाराव श्रीरामे, हेमंत बिचकेवार यांनी या प्रकरणाचा उलगडा केला.

'बाफना ब्रीज'वर गायकवाड थांबली होती शूटरची वाट पाहत परभणीच्या दोन भावांना धडा शिकवण्यासाठी सविता गायकवाडने ९ जानेवारीला गोपीनाथ बालाजी मुंगल, किरण सुरेश मोरे (दोघे रा. धनेगाव), अवधूत ऊर्फ लहूजी गंगाधर दासरवाड (रा. बळीरामपूर), विकास कांबळे (रा. हदगाव) यांना फोन करून घरी बोलावून घेतले होते. मला परभणी येथील रहीम खान आणि जफरखान त्रास देत असून, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांना दिली. मला त्यांना धडा शिकवायचा आहे. मोरे आणि मुंगल यांना तुम्ही पिस्टल घेऊन बाफना येथे या अन् मला गोळी मारून निघून जा, असे तिने सांगितले. त्याप्रमाणे मोरे आणि मुंगल पिस्टल घेऊन बाफना ब्रीजवर आले. ते येण्यापूर्वीच गायकवाड तिथे वाट पाहत उभी होती.

सीसीटीव्ही नसल्याची केली खात्री बाफना ब्रीज परिसरात सीसीटीव्ही नसल्याची खात्री आरोपींनी केली होती. मुंगल आणि मोरे हे दोघेजण ब्रीजवर आल्यानंतर मोरे हा येणाऱ्याा-जाणाऱ्या वाहनांवर नजर ठेवून होता. रात्री अकरा वाजता ब्रीजवर कुणीही नसताना गायकवाडने सांगितल्याप्रमाणे मंगलने सविता गायकवाडच्या डाव्या दंडावर गोळी झाडून पळ काढला. त्यानंतर स्वतः सविता गायकवाडने पोलिसांना फोन करून रहीम खान आणि जफर खान यांनी माझ्यावर गोळीबार केल्याचे सांगितले होते. आरोपींकडून पिस्टल आणि चार काडतुसे पोलिसांनी जप्त केली.

Last Updated : Jan 12, 2023, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.