नागपूर - नागपूर वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारे एक विशेष पथकाच्या सहायाने गोंदिया येथे वनविभागाच्या पथकासह सालेकसा परीसरात काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बिबट्याची कातडी, दात, मिशा, पंजे इत्यादी मुद्देमालही यावेळी या पथकाने जप्त केला आहे. (Leopard skin, teeth, mustache, claws ) नागपूर वनविभागाच्या विशेष पथकाने मागील काही महिन्यांपासून वाघाच्या व इतर वन्यप्राण्यांच्या अवयवाच्या तस्करी करणाऱ्या अनेक आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यावेळी आणखी काही माहिती नागपूर वनविभागास प्राप्त झाली होती. ( Nagpur Forest Department ) त्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
ताब्यात घेतलेल्यांची नावं
ताब्यात घेतलेल्यांमध्ये राधेश्याम जोहर उईके वय 50 वर्ष रा. दल्लाटोला सालेकसा, जागेश्वर सुप्रितदास दसऱ्या वय 31 वर्ष रा. धनुसुरवा/बोरी सालेकसा, पप्पु जोहरलाल मडावी वय 32 वर्ष रा. जांभळी सालेकसा, दिनेश प्रभुद्याल श्रीवास्तव वय 49 वर्ष रा. खात भंडारा, संदीप चोखा रामटेकर वय 38 वर्ष रा. पालोरा भंडारा, दिनेश ताराचंद शहारे वय 32 वर्ष रा. देवरी भंडारा, विनोद सुखदेव दशरिया वय 27 वर्ष रा. ब्राम्हणटोला सालेकसा, लितेश कृष्णकुमार कुंभरे वय 32 वर्ष रा. बाघनदी राजनांद गाव छत्तीसगड, परशराम रमा मेश्राम वय 50 वर्ष रा. गिरोला सालेकसा, सुभेचंद सोनसाय नेताम वय 40 वर्ष रा. दल्लाटोल सालेकसा, इंद्रलाल नेताम वय 30 वर्ष रा. दल्लाटोल सालेकसा असे नाव आहेत.
गुप्त बातमीदारांकडून माहिती समजली होती
गोंदिया वनविभागाचे पथकाला गुप्त बातमीदारांकडून माहिती समजली होती की गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाचे मैदानावर बिबटच्या कातडीची विक्री होत आहे. ( Sale of bibt skins ) माहिती समजताच वनविभागाच्या संयुक्त पथकाने सापळा रचून १० आरोपींना सापळा अटक केली आहे. ( Gondia Forest Department ) यामध्ये राधेश्याम जोहार उईके, जोगेश्वर सुप्रीत्रदास दसेरीया, पप्पू जोहारलाल मडावी, दिनेश प्रभुदयाल श्रीवास्तव, संदिप चोखा रामटेके, दिनेश ताराचंद सहारे, विनोद सुखदेव दशरीया, लितेश कृष्णकुमार कुंभरे, परसराम राया मेश्राम आणू रामकृष्ण छोटेलाल डहाले अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून बिबटची चामडे, 4 पंजे, दात, मिशा आणि 3 मोटार सायकल इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला आले असून संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जुलै महिन्यात केली बिबट्याची शिकार
बिबट कोसमतर्राच्या जंगलात जुलै 2021 मध्ये शिकार करून त्याचे अवयव काढण्यात आले. त्यानंतर विक्री करण्यासाठी बाहेर काढले असल्याची माहिती आरोपींनी चौकशी दरम्यान दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी या आधीही अशाप्रकारे आणखी वन्य प्राण्यांना मारले आहे का ? याचा तपास वन विभागाने सुरू केला आहे.
हेही वाचा - Mahaparinirvan Diwas : बाबासाहेबांनी चौदावेळा केला होता सोलापूरचा दौरा, पहा ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट