ETV Bharat / state

Coronavirus : नांदेडमध्ये 962 रुग्ण कोरोना संभावित.. 605 जणांचा अहवाल निगेटिव्ह

नांदेड जिल्ह्यात एकुण 962 संशयितांची नोंद झाली आहे. यापैकी घेण्यात आलेले स्वॅब एकूण 649 आहेत. त्यापैकी 605 निगेटिव्ह असून 38 स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण 5 स्वॅब तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे.

962 patient corona Suspected in Nanded .. 605 report negative
नांदेडमध्ये 962 रुग्ण कोरोना संभावित.. 605 जणांचा अहवाल निगेटिव्ह
author img

By

Published : Apr 26, 2020, 3:10 PM IST

नांदेड - आतापर्यंत घेण्यात आलेले स्वॅब 649 असून त्यापैकी 1 रुग्णाचा स्वॅब कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारासाठी दाखल आहे. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व दमा यासारखे गंभीर आजार असल्यामुळे प्रकृती गंभीर आहे. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण 80 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जनतेने कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

कोरोना विषाणु संदर्भात आज शनिवार 25 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण 962 संशयितांची नोंद झाली आहे. यापैकी घेण्यात आलेले स्वॅब एकूण 649 आहेत. त्यापैकी 605 निगेटिव्ह असून 38 स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण 5 स्वॅब तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
▪️एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 1
▪️आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन - 801
▪️क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 268
▪️अजून निरीक्षणाखाली असलेले - 161
▪️पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 38
▪️घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 763
▪️आज तपासणीसाठी नमुने घेतले- 49
▪️एकुण नमुने तपासणी- 659
▪️पैकी निगेटीव्ह - 605
▪️नमुने तपासणी अहवाल बाकी- 38

नाकारण्यात आलेले नमुने - 5

▪️जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 80,663 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.