नांदेड - जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक झाली असून, बळीची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवार (दि. 23 जुलै) तब्बल पाच कोरोनाबाधित रुग्णांचे बळी गेले आहेत. तर 56 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 1 हजार 130 इतकी झाली आहे. तर कोरोना मृतांचा आकडा 63 वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढत असताना दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच सक्रिय रुग्णांचा आलेख कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. आजपर्यंत 610 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 56 रुग्ण आढळले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 1 हजार 130 वर पोहोचली आहे. आज 36 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. 5 जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 63 एवढी झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या 218 नमुने तपासणी अहवालापैकी पैकी 149 नमूने निगेटीव्ह आले आहेत व 56 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 1130 झाली आहे. आजवर डिस्चार्ज झालेले रुग्ण 610 असून उपचार घेत असलेले रुग्ण हे 458 आहेत. प्रलंबित असलेल्या स्वॅबची संख्या 492 एवढी आहे.
नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाबत माहिती (23 जुलै, सायंकाळी 7 वाजेपर्यंत)
- आत्तापर्यंत एकूण संशयित -10 हजार 508
- एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 9 हजार 128
- क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 5 हजार 726
- अजून निरीक्षणाखाली असलेले - 707
- पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 63
- घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 9 हजार 65
- आज घेतलेले नमुने - 382
- एकुण नमुने तपासणी- 11 हजार 318
- एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 1 हजार 130 (पैकी ०8 संदर्भीत आलेले आहेत)
- निगेटीव्ह रुग्ण - 8 हजार 935
- नमुने तपासणी अहवाल बाकी- 492
- नाकारण्यात आलेले नमुने -201
- अनिर्णित अहवाल – 544
- कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 610
- कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 63 (पैकी बाहेर जिल्ह्यातील 10)
- जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी- 1 लाख 48हजार 400