ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा - नांदेड पाऊस न्यूज

यंदाचा पाऊस जिल्ह्यासाठी समाधानकारक झाला आहे. जून महिन्यापासूनच पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ११२ प्रकल्पात ३६६.८७ द.ल.घ.मी म्हणजेच ४९ .१७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

50% water storage in Nanded district
नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस
author img

By

Published : Aug 7, 2020, 8:06 PM IST

नांदेड - यंदाचा पाऊस जिल्ह्यासाठी समाधानकारक झाला आहे. जून महिन्यापासूनच पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ११२ प्रकल्पात ३६६.८७ द.ल.घ.मी म्हणजेच ४९ .१७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातील ३० प्रकल्पात ८३४.०८ दलघमी म्हणजेच ८८.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यात गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी गेल्या दोन महिन्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न तूर्त तरी मिटला आहे. तसेच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनीदेखील वेळेवर पेरण्या केल्या आहेत. नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील इसापूरच्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातही ५१३.५७ दलघमी (५३.२७ टक्के ) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी इसापूरच्या प्रकल्पात १३.३७ दलघमी (१.४१ टक्के) पाणीसाठा होता. या धरणातून जिल्ह्यातील बरेच क्ष्रेत्र ओलिताखाली असल्यामुळे वर्षभराचा हंगाम अवलंबून असतो.

नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, जिल्ह्यात ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा

तसेच जिल्ह्यात मानार आणि विष्णुपुरी हे दोन मोठे प्रकल्प, ९ उच्च पातळी बंधारे, ९ मध्यम प्रकल्प, ८८ लघु प्रकल्प आणि ४ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असे एकूण ११२ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचा साठवण क्षमता ७४६.१३ दलघमी एवढी आहे. सध्या या ११२ प्रकल्पात ३६६.८७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा (४९ .१७ टक्के) आहे. विष्णुपुरी प्रकल्प तीनदा भरल्याने एक दरवाजा उघडून गोदावरी नदीत पाणी सोडावे लागले होते.

सध्या विष्णुपुरी प्रकल्पात ७१.४७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा (८८.४६ टक्के) आहे. मानार प्रकल्पात ९४.१० दलघमी (६८.०८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. ९ मध्यम प्रकल्पात ९५.२७ दलघमी (६८.५१ टक्के) , ९ उच्च पातळी बंधाऱ्यात ४५.१४ दलघमी (२३.७८ टक्के) तर ८८ लघु प्रकल्पात ६०.८९ दलघमी (३१.९१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. ४ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असून त्याचे दरवाजे सध्या उघडण्यात आल्याने त्यात पाणीसाठा साचला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.