ETV Bharat / state

नांदेडमध्ये रविवारी आढळले नवे 47 कोरोना रुग्ण ; तर तिघांचा मृत्यू - नांदेड कोरोना रिपोर्ट

जिल्ह्यात बाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून रविवार प्राप्त झालेल्या एकुण 265 अहवालापैकी 47 जण नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 198 निगेटिव्ह आले आहेत. यातील 3 बाधित हे इतर जिल्ह्यातील असून उपचारासाठी नांदेड येथे दाखल झाले आहेत.

नांदेड कोरोना अपडेट
नांदेड कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 13, 2020, 7:05 AM IST

नांदेड - जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होत आहे. बाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून रविवार प्राप्त झालेल्या एकुण 265 अहवालापैकी 47 जण नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 198 निगेटिव्ह आले आहेत. यातील 3 बाधित हे इतर जिल्ह्यातील असून उपचारासाठी नांदेड येथे दाखल झाले आहेत.

जिल्ह्यातील एकूण 616 वर पोहचली आहे. यात 47 बाधितांपैकी 16 बाधितांचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. तर उर्वरीत 28 बाधितांचा अहवाल रविवारी प्राप्त झाला. तसेच 14 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 375 बाधितांना सुट्टी देण्यात आली आहे.

शनिवार वजिराबाद नांदेड येथील 64 वर्षीय पुरुष रुग्णाचा, रविवारी सोमेश कॉलनी येथील 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा आणि परभणी आनंदनगर येथील 34 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे मृत्यू झाला. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, मधुमेह इतर गंभीर आजार होते.

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या 30 एवढी झाली आहे. नवीन बाधितांमध्ये उमर कॉलनी देगलूरनाका येथील 55 वर्षीय महिला, दुलेशहानगर (रहेमाननगर) येथील 61 वर्षीय महिला, हमिदियानगर येथील 40 वर्षीय महिला, फरांदेनगर येथील 59 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, 3 वर्षीय बालक, गोकुळनगर येथील 66 वर्षीय पुरुष, गंगाचाळ येथील 58 वर्षीय पुरुष, राजनगर येथील 20 वर्षीय महिला, सिडको येथील 3 वर्षीय मुलगा, आसर्जन येथील 38 वर्षीय पुरुष, धनेगाव येथील 9 वर्षीय मुलगी, वाजेगाव येथील 41 वर्षीय पुरुष, मुखेड शहरातील अनुक्रमे 33, 55 व 85 वर्षीय 3 पुरुष, 65 वर्षीय महिला, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 12 व 32 वर्षाचे 2 पुरुष, कावळगाव येथील 13 वर्षीय महिला, धर्माबाद तालुक्याती शंकर गंज येथील 11 व 40 वर्षाचे 2 पुरुष, 55 वर्षीय महिला, बिलोली गांधी चौक येथील 39 वर्षीय पुरुष, कुंडलवाडी येथील 46 वर्षीय पुरुष, नरसी नायगाव येथील 45 व 48 वर्षाचे 2 पुरुष, 65 वर्षीय महिला, नागोबा मंदिर परिसर देगलूर येथील 68 वर्षीय महिला, 64 वर्षीय पुरुष, देगलूर शहरातील 58 वर्षीय पुरुष, विकासनगर कंधार येथील अनुक्रमे 6, 6, 32, 43, 46, 55, 65 वर्षाच्या 6 महिला, 15 वर्षीय पुरुष, कंधार तालुक्यातील काटकळंबा येथील 55 वर्षीय महिला, मुदखेड तालुक्यातील बाजार महोल्ला येथील 18 व 13 वर्षाच्या 2 महिला, परभणी जिल्ह्यातील जिंतूर कावी 70 वर्षीय पुरुष, वसमत तालुक्यातील गुंज येथील 33 वर्षीय महिला, लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील 60 वर्षाचा एका पुरुषांचा यात समावेश आहे.

211 बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील 25 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात 10 महिला व 15 पुरुष आहेत. रविवारी 196 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल सोमवारी संध्याकाळी प्राप्त होतील. रविवारी 616 बाधितांपैकी 30 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 375 बाधित हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरीत 211 बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 70, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 54, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 27, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 7, जिल्हा रुग्णालय येथे 6, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 11, हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे 2, किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात 17 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 7 बाधित औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे -

  • सर्वेक्षण - 1 लाख 47 हजार 742
  • आतापर्यंत घेतलेले स्वॅब - 8 हजार 159
  • निगेटिव्ह स्वॅब - 6 हजार 774
  • रविवारची पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 44 (यात बाहेरुन जिल्ह्यातून आलेले 3) असे एकुण 47
  • रविवारी स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - 7 मृत्यू
  • रविवारची अनिर्णीत संख्या - 15
  • एकुण पॉझिटिव्ह बाधित रुग्ण - 616
  • मृत्यू संख्या - 30
  • रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 375
  • रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - 211
  • प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - 196

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.