ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यातील मांडावीत पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत; 44 व्यक्तीसह 20 जनावरांचे तोडले लचके - चावला3

रात्री दोन वाजेच्या सुमारास वारा सुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. उकाड्याने त्रस्त होत असल्याने घरात झोपलेल्या महिला, पुरुष, छोटे मुले बाहेर अंगणात येऊन झोपले होते. त्या दरम्यान एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला चढवत एकामागे एक अशा ४४ लोकांना चावा घेतला. तसेच २० जनावरांनादेखील जखमी केले.

नांदेड जिल्ह्यातील मांडावीत पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत
author img

By

Published : Jun 1, 2019, 12:17 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील मांडवी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने दहशत माजवली आहे. दिसेल त्याला चावा घेत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. बुधवारी रात्री झोपलेल्या ४४ लोकांसह २० जनावरांना चावा घेतला आहे. त्यामुळे लोकांनी रात्र जागून काढली आहे. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नांदेड जिल्ह्यातील मांडावीत पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत; 44 व्यक्तीसह 20 जनावरांचे तोडले लचके

मांडवीत बुधवारी आठवडी बाजार भरतो. बाजार संपल्यानंतर संध्याकाळी सर्व गाव झोपेत असताना रात्री दोन वाजेच्या सुमारास वारा सुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. उकाड्याने त्रस्त होत असल्याने घरात झोपलेल्या महिला, पुरुष, छोटे मुले बाहेर अंगणात येऊन झोपले होते. त्या दरम्यान एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला चढवत एकामागे एक अशा ४४ लोकांना चावा घेतला. तसेच २० जनावरांनादेखील जखमी केले. त्यामुळे गावात दहशत निर्माण झाली आहे. तसेच नागरिकांनी रात्र जागून काढली आहे.

जखमी रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. रेबिज नावाची लस रुग्णांना देण्यात आली असल्याचे माहिती जनावरांचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम राठोड यांनी दिली.

मांडवीत मोकाट कुत्रे व जनावरांचा उच्छाद वाढला आहे. याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नागिकांना मनस्ताप होत आहे. याबाबीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Intro:नांदेड - मांडावीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस 44 व्यक्तीसह 20 जनावरांचे तोडले लचके.

नांदेड : मांडवी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घालत दिसेल त्याला चावा घेतल्याने नागरिकांमध्ये
दहशत पसरली आहे. बुधवारी रात्री झोपलेल्या ४४ लोकांसह २०जनावरांना चावा घेतला त्यामुळे लोकांनी रात्र जागून काढली आहे.Body:पिसाळलेल्या कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.मांडवीत बुधवारी आठवडी
बाजार होता. बाजार संपल्यानंतर संध्याकाळी जेवण आटोपून अख्खे गाव झोपेत असताना,रात्री दोन वाजेच्या सुमारास वारा सुटल्याने वीज पुरवठा खंडीत
झाला. उकाड्याने त्रस्त होत असल्याने घरात झोपलेले महिला, पुरुष, छोटे मुले बाहेर आपल्याला अंगणात येऊन झोपी गेले.त्या दरम्यान,एका पिसाळलेला कुत्र्याने अचानक हल्ला चढवत एकामागे एक अशा ४४ लोकांना चावा घेतला. तसेच २० जनावरांना देखील जखमी केले. त्यामुळे गावात दहशत निर्माण
होवून नागरिकांनी रात्र जागून काढली आहे.Conclusion:जखमी रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आला. रेबिज नावाची लस व्यक्ती, रुग्णांना लस देण्यात आली असल्याचे माहिती वैद्यकीय
जनावरांचे अधिक्षक डॉ विक्रम राठोड यांनी सांगितले.
मांडवीत मोकाट कुत्रे व जनावरांचा उच्छाद वाढला आहे.याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने
नागिकांना मनस्ताप होत आहे. याबाबीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याबदल नाराजी व्यक्त होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.