ETV Bharat / state

तिप्पट नोटांचे आमिष दाखवून ३ लाखांची फसवणूक; तेलंगणातील आरोपींना अटक - nanded crime

तीन लाख रुपयांच्या बदल्यात 10 लाखांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून तीन भामट्यांनी गंडा घातल्याचे समोर आले आहे. तेलंगणामधील निजामाबाद जिल्ह्यातील तिघांनी मुखेड तालुक्यातील उमरदरीतील व्यक्तीची फसवणूक केली आहे.

nanded crime news
तिप्पट नोटांचे आमिष दाखवून ३ लाखांची फसवणूक; तेलंगणातील आरोपींना अटक
author img

By

Published : Jan 10, 2020, 12:21 PM IST

नांदेड - तीन लाख रुपयांच्या बदल्यात 10 लाखांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून तीन भामट्यांनी गंडा घातल्याचे समोर आले आहे. तेलंगणामधील निजामाबाद जिल्ह्यातील तिघांनी मुखेड तालुक्यातील उमरदरीतील व्यक्तीची फसवणूक केली आहे.

उमरदरी येथील शिवलिंग गोगे नामक व्यक्तीला मागील पंधरा दिवसांपासून अनोळखी व्यक्तीचे फोन येत होते. संबंधित व्यक्तीने आपण निजामाबादचे रहिवासी असून मोहम्मद एजाज नाव असल्याचे सांगितले. तसेच आपल्याकडे 500 रुपयांच्या खऱ्या नोटा असून आपले आरबीआयशी नेटवर्क असल्याने रेकॉर्डवर नसलेल्या नोटा असतात, असे भासवले. आपण तीन लाखांच्या बदल्यात 10 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून 9 जानेवारीला सकाळी 3 लाख रुपयांसह बोधन बसस्थानकावर बोलवले.

हेही वाचा - अमेरिकन डॉलरची चोरी करणाऱ्या आरोपीला हैदराबादमधून अटक

ठरल्याप्रमाणे शिवलिंग गोगे यांनी बोधनला गेल्यावर या व्यक्तीला फोन केला. बिलोली बसस्थानकासमोर येण्याचा निरोप दिल्यावर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन वेगवेगळ्या मोटारसायकलवरून तिघेजण आले. त्यापैकी एकाने आपण मोहम्मद एजाज असल्याचे सांगितले. यानंतर त्याने पैशांबद्दल विचारणा केली. शिवलिंग यांनी सोबत नेलेले तीन लाख रुपये दाखवले. यानंतर एजाजने सोबत असलेल्या व्यक्तींना दहा लाख देण्याचे सांगून स्वत: तीन लाखांची रक्कम घेऊन पळ काढला. त्याच्या दोन साथीदारांनी बाजूला नेऊन त्यांच्याजवळील 500 रुपयांच्या नोटांचे 20 बंडल दिले. शिवलिंग यांनी ते पाहिल्यानंतर सुरुवातीच्या बंडलमध्ये 3 खऱ्या नोटा व शेवटच्या बंडलमध्ये एक खरी नोट होती. उरलेल्या चिल्ड्रन्स बँकेच्या बनावट नोटा असल्याचे लक्षात आले.

हेही वाचा - चोरीच्या घटनांमध्ये वाढ; आठवड्यात दोन एटीएम मशीन चोरीला

आपली फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर शिवलिंग गोगे यांनी पोलिसांशी संपर्क साधला. गोगे यांनी पोलिसांना घडलेला प्रकार कथन केला. चौकशीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक भारती व त्यांचे पथक या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी त्या दोघांनाही ग्लॅमर दुचाकीसह पकडले.

हेही वाचा - भरदिवसा घरफोडी; मुलीच्या उच्च शिक्षणासाठी ठेवलेल्या 22 लाख ६५ हजारांच्या रोकडसह ऐवज लंपास

शेख खैसर शेख हैदर(वय- 27) आणि शेख नदीम शेख मन्नाम (वय - 27) या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हे दोघेही निजामाबाद, तेलंगणाचे रहिवासी आहेत. तसेच त्यांचा साथीदार साथीदार मोहम्मद एजाज हा निजामाबादच्या ड्रायव्हर्स कॉलनीतील रहिवासी आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Intro:नांदेड : तिप्पट नोटांचे आमिष दाखवून ३ लाखाला गंडविले.
- नोटांची डील करताना स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना घेतले ताब्यात.

नांदेड : तीन लाख रुपयांच्या बदल्यात १० लाख रुपयांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून शेजारच्या तेलंगणामधील निजामाबाद जिल्ह्यातील तीन भामट्यांनी मुखेड तालुक्यातील उमरदरी येथील
तस्णाला ३ लाख रुपयांना गंडविले.Body:मुखेड तालुक्यातील उमरदरी येथील शिवलिंग गोगे याला गेल्या १५ दिवसापासून ९७७३०६३९२७ या मोबाईल क्रमांकावर ८१९७६००२५९, ७८८७७९५९५०, ९८८५१७९१५७, ७०३६३२७६०७ या मोबाईल क्रमांकावरुन अनोळखी इसमाचे अनेक फोन आले. त्या इसमाने आपण निजामाबाद चे राहणारे असून आपलेनाव मोहंम्मद एजास असल्याचे सांगून आपल्याकडे ५०० रुपयांच्या खऱ्या नोटा असून आपले आरबीआयशी नेटवर्क असल्याने रेकॉर्डवर नसलेल्या नोटा असतात. आपण ३ लाखाच्या बदल्यात १० लाख रुपये देऊ असे आमिष दाखविले व ९ जानेवारी रोजी सकाळी ३ लाख रुपये घेवून बोधन बसस्थानकावर बोलाविले. त्याप्रमाणे
शिवलिंग गोगे यांनी बोधनला गेला नंतर त्याला फोन केला. तुम्ही बिलोली बसस्थानकासमोर या, असा निरोप त्याने दिला. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ग्लॅमर मोटारसायकलवरुन तिघेजण आले. त्यापैकी एकाने आपण मोहम्मद एजास असल्याचे सांगितले आणि पैसे कुठे आहेत म्हणून विचारणा केली.शिवलिंग यांनी सोबत नेलेले ३ लाख
रुपये दाखविले असता त्याने ते पैसे घेतले आणि ग्लॅमर दुचाकीवर आलेल्या अन्य दोघाजणांना त्यांच्याजवळील १० लाख रुपये देण्यास सांगून तो मोहम्मद एजाज निघून गेला. त्याच्या दोन साथीदारांनी
बाजूला नेवून त्यांच्याजवळील ५०० रुपयांच्या नोटांचे २० बंडल दिले.शिवलिंग यांनी ते पाहिले असता सुरुवातीच्या बंडलमध्ये ३ खऱ्या ५०० रुपयांच्या
चलनी नोटा व शेवटच्या बंडलमध्ये खालून एक ५०० रुपयांची खरी चलनी नोट होती. उरलेल्या चिल्ड्रन्स बँकेच्या बनावट नोटा असल्याचे लक्षात आले.Conclusion:आपली फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर शिवलिंग गोगे चौकशी करीत असताना स्थानिक गुन्हे शाखे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती व त्यांच्या पथकातील सहकारी तिथे पोहचले. त्यांनी त्या दोघांना
ग्लॅमर दुचाकीसह पकडले. गोगे यांनी पोलिसांना घडलेला प्रकार कथन केला. त्यांची नावे शेख खैसर शेख हैदर-२७, रा.ड्रायव्हर कॉलनी मस्जीदजवळ वरणी रोड नागाराम निजामाबाद तेलंगणा, शेख
नदीम शेख मन्नाम-२७ रा. ५० क्वॉटर्स नागाराम निजामाबाद असे असल्याचे सांगितले. त्यांचा साथीदार मोहम्मद अजीज हा निजामाबाद च्या ड्रायव्हर्स कॉलनीमधील राहणारा आहे. त्यांनी अनेकजणांना फसविले, अशी तक्रार शिवलिंग गोगे
यांनी पोलिसात दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.