ETV Bharat / state

नांदेडमध्ये 15 नव्या कोरोना चाचणी केंद्रांची निर्मिती - कोरोना लेटेस्ट न्यूज नांदेड

शहरात कोरोना साथीचा उद्रेक झाला आहे. गेल्या दोन-चार दिवसांपासून हजाराच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. शहरी भागात झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत असताना, कोरोना चाचणी केंद्रांची कमतरता जाणवत होती. मात्र आता ही गरज पूर्ण झाली असून, महापालिकेने उत्तर व दक्षिण नांदेडमध्ये कोरोना चाचणी केंद्रांची संख्या वाढली आहे.

नांदेडमध्ये 15 नव्या कोरोना चाचणी केंद्रांची निर्मिती

author img

By

Published : Mar 24, 2021, 5:25 PM IST

नांदेड - शहरात कोरोना साथीचा उद्रेक झाला आहे. गेल्या दोन-चार दिवसांपासून हजाराच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. शहरी भागात झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत असताना, कोरोना चाचणी केंद्रांची कमतरता जाणवत होती. मात्र आता ही गरज पूर्ण झाली असून, महापालिकेने उत्तर व दक्षिण नांदेडमध्ये कोरोना चाचणी केंद्रांची संख्या वाढली आहे. नांदेडमध्ये आता 15 नवीन कोरोना चाचणी केंद्र उभारण्यात आले आहेत. याचा फायदा सामान्य जनतेला होणार आहे.

शहरी भागात कोरोनाची साथ झपाट्याने पसरत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने त्याचा ताण नाना-नानी पार्कमध्ये असलेल्या एकाच कोरोना चाचणी केंद्रावर आला होता. केंद्रावर कोरोना चाचणी करून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या रांगा लागायच्या, गर्दी वाढत असल्यामुळे कोरोना संसर्गाचा देखील धोका निर्माण झाला होता. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नांदेडमध्ये कोरोना चाचणी केंद्राची संख्या वाढवण्यात आली आहे.

कोरोना चाचणीचा वेग वाढणार

कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नांदेड उत्तर व दक्षिणमध्ये नवीन पंधरा ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांना त्या - त्या भागातील नगरांना जोडण्यात आले असून, त्यासाठी शहराचे पंधरा विभाग तयार करण्यात आले आहेत. या केंद्रांमुळे आता कोरोना चाचणी गतीने होण्यास मदत होणार आहे. मनपा सांगवी दवाखाना, मनपा तरोडा दवाखाना, मनपा जंगमवाडी दवाखाना , मनपा पौर्णिमानगर दवाखाना, शिवाजीनगर मातृसेवा केंद्र मनपा दवाखाना, मनपा विनायकनगर दवाखाना ( नवीन इमारत ), मनपा श्रावस्तीनगर दवाखाना, मनपा खडकपूरा दवाखाना, मनपा शाळा वजिराबाद, हैदरबाग दवाखाना, मनपा करबला दवाखाना, मनपा अरबगल्ली दवाखाना, मनपा कौठा दवाखाना आणि मनपा सिडको दवाखाना या नवीन पंधरा ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.