नांदेड - जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 733 अहवालापैकी 1 हजार 375 अहवाल कोरोनाबाधित आढळले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 969 तर अँटिजेन तपासणीद्वारे 406 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 69 हजार 262 एवढी झाली असून यातील 53 हजार 746 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 13 हजार 983 रुग्ण उपचार घेत असून 193 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू -
दिनांक 17 ते 19 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 272 एवढी झाली आहे. दिनांक 17 एप्रिल रोजी देगलूर कोरोना रुग्णालय येथे दत्त नगर देगलूर येथील 60 वर्षाचा पुरुष व 78 वर्षाची महिला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे कंधार येथील 75 वर्षाची महिला, हदगाव तालुक्यातील शिरड येथील 60 वर्षाची महिला, सिडको नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष , नायगाव येथे 78 वर्षाचा पुरुष, घुंगराळा येथील 75 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोरोना हॉस्पिटल येथे हदगाव तालुक्यातील कोळगाव येथील 34 वर्षाचा पुरुष, मुदखेड येथे 45 वर्षाचा पुरुष, मुखेड येथील 73 वर्षाची महिला, कंधार येथील 49 वर्षाची महिला अपेक्षा कोरोना रुग्णालय दंडे गल्ली मुखेड येथील 63 वर्षाचा पुरुष, सनराईज कोरोना रुग्णालय आंबेकर नगर नांदेड येथील 92 वर्षाचा पुरुष , गोदावरी कोरोना रुग्णालय येथे आनंदनगर नांदेड येथील 71 वर्षाची महिला, लोटस कोरोना रुग्णालय अर्धापूर तालुक्यातील धामधरी येथील 67 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.59 टक्के आहे.
आरटीपीसीआर तपासणी -
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 367, नांदेड ग्रामीण 35, अर्धापूर 62, भोकर 74, बिलोली 43, देगलूर 58, धर्माबाद 44, हिमायतनगर 12, कंधार 2, किनवट 9, लोहा 58, मुखेड 65, मुदखेड 9, नायगाव 90, उमरी 28, हदगाव 5, परभणी 2, हिंगोली 3, यवतमाळ 1,लातूर 1, सातारा 1, असे एकूण 969 बाधित आढळले.
ॲन्टिजेन तपासणी -
आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 86, नांदेड ग्रामीण 3, अर्धापूर 4, भोकर 1, बिलोली 4, देगलूर 3, धर्माबाद 35, हदगाव 17, हिमायतनगर 10, कंधार 12, किनवट 14, लोहा 2, माहूर 16, मुदखेड 4, मुखेड 133, नायगाव 43, उमरी 9, परभणी 1, लातूर 1, यवतमाळ 1, हिंगोली 6, निजामबाद 1 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 406 बाधित आढळले आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर डिस्चार्ज -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 17, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 704, मुदखेड तालुक्यातर्गत 4, देगलूर कोरोना रुग्णालय 4, बिलोली तालुक्याअंतर्गत 50, नायगाव तालुक्यातंर्गत 20, जिल्हा रुग्णालय कोरोना हॉस्पिटल 34, मुखेड कोरोना रुगणालय 72, कंधार तालुक्याअंतर्गत 4, माहूर तालुक्यातंर्गत 22, अर्धापूर तालुक्यातंर्गत 2, बारड कोरोना केअर सेटर 9, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 15, हदगाव कोरोना रुग्णालय 59, उमरी तालुक्यातंर्गत 41, धर्माबाद कोरोना केअर सेटर 15, खाजगी रुग्णालय 95 यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 13 हजार 983 बाधितांवर औषधोपचार सुरु -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 218, जिल्हा रुग्णालय कोरोना हॉस्पिटल नांदेड 117, जिल्हा रुग्णालय कोरोना हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 205, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 145, किनवट कोरोना रुग्णालय व कोरोना केअर सेंटर 114, मुखेड कोरोना रुग्णालय व कोरोना केअर सेंटर 235, देगलूर कोरोना रुग्णालय 54, जैनब हॉस्पिटल कोरोना केअर सेंटर 67, बिलोली कोरोना केअर सेंटर 248, हिमायतनगर कोरोना केअर सेंटर 13, नायगाव कोरोना केअर सेंटर 59, उमरी कोरोना केअर सेंटर 64, माहूर कोरोना केअर सेंटर 55, भोकर कोरोना केअर सेंटर 31, हदगाव कोरोना रुग्णालय 41, हदगाव कोरोना केअर सेंटर 32, लोहा कोरोना रुग्णालय व कोरोना केअर सेंटर 120, कंधार कोरोना केअर सेंटर 26, धर्माबाद कोरोना केअर सेंटर 135, मुदखेड कोरोना केअर सेंटर 153, अर्धापूर कोरोना केअर सेटर 32, बारड कोरोना केअर सेंटर 19, मांडवी कोरोना केअर सेंटर 8, एनआरआय कोरोना केअर सेंटर 87, पंजाब भवन कोरोना केअर सेंटर 175, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 5 हजार 575, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 4 हजार 62, खाजगी रुग्णालय 1 हजार 892, हैद्राबाद येथे संदर्भित 1, असे एकूण 13 हजार 983 रुग्ण उपचार घेत आहेत.
उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 12, जिल्हा रुग्णालय कोरोना हॉस्पिटल नांदेड येथे 7, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 14 खाटा उपलब्ध आहेत.
कोरोना संशयित व बाधितांची संक्षिप्त माहिती -
एकुण घेतलेले स्वॅब - 4 लाख 18 हजार 191
एकुण निगेटिव्ह स्वॅब - 3 लाख 40 हजार 863
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 69 हजार 262
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 53 हजार 746
एकुण मृत्यू संख्या -1 हजार 272
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.59 टक्के
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या -36
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या -75
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या -399
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती -13 हजार 983
अतिगंभीर प्रकृती असलेले -193