ETV Bharat / state

नांदेडचे 11 जण निजामुद्दीनहून परतले, नऊ जण दवाखान्यात दाखल, तर दोघांचा शोध सुरू

author img

By

Published : Apr 2, 2020, 9:19 AM IST

नांदेडचे ११ जण सहभागी झालेले आहेत. ते सर्व जण नांदेडात दाखल झाले. त्यांच्यापैकी ९ जणांचा शोध घेऊन त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

nizamuddin community program
नांदेडचे 11 जण निजामुद्दीनहून परतले

नांदेड - नवी दिल्ली येथील निजामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमध्ये आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात नांदेडचे ११ जण सहभागी झालेले आहेत. ते सर्व जण नांदेडात दाखल झाले. त्यांच्यापैकी ९ जणांचा शोध घेऊन त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य दोघांचा तपास चालू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वातावरणामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथील निजामुद्दीनमध्ये मोठा जमाव जमल्याचे प्रकरण तीन दिवसांपूर्वी उघडकीला आले. येथे तबलीग-ए-जमात या मुस्लिम धर्म प्रचारक संघटनेने आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी देश-विदेशातून असंख्य जण सहभागी झाले होते. देशात सर्वत्र जमावबंदी असताना येथे इतक्या मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने लोकांना धक्काच बसला. त्या लोकांची तपासणी केली असता त्यांच्यापैकी तब्बल २४ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. इतकेच नव्हे तर इज्तेमा आटोपून आपआपल्या राज्यात शेकडो लोक परत गेले होते. त्यांच्यापैकी सहा जण तेलंगणामध्ये एक जण काश्मिरात तर एक जण तामिळनाडूत कोरोनाच्या संसर्गामुळे मरण पावल्याचेही समजले आहे.

निजामुद्दीनमधील इज्तेमासाठी महाराष्ट्रातून सुमारे ११० लोक गेले होते. त्यांच्या पैकी ११ जण नांदेडचे होते. ते सर्व जण नांदेडमध्ये परत आले आहेत. याची माहिती वरिष्ठ पातळीवरून जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. मंगळवार दुपारपासून प्रशासनाने तबलिगी मरकझमध्ये सहभागी झालेल्या जिल्ह्यातील ११ जणांचा शोध सुरू केला. निजामुद्दीनचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली. नांदेडातील ११ जणांचा शोध सुरू केला. त्यांच्यापैकी ९ जणांना ताब्यात घेऊन सरकारी दवाखान्यामध्ये तपासणी व अन्य उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एका जणास पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अन्य दोघांचा शोध चालू असल्याचे स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर हे ११ जण नांदेडात आल्यापासून कोणा-कोणाच्या संपर्कात आले होते, कोणाला भेटले होते, त्याचाही तपास चालू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.