ETV Bharat / state

नांदेड : ११ महिन्यात शंभराहून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले - शंभराहून अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या

लाखोंचा पोशिंदा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो बळीराजाच संकटात सापडला आहे. कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारी नापिकी, तर कधी कर्जबाजारीपणामुळे त्याच्यावर दुहेरी संकट आले आहे. परिणामी पुरता खचून गेलेला शेतकरी अनेकदा मृत्यूला कवटाळतो, असे दिसून आले आहे. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच आहे.

शेतकरी आत्महत्या
author img

By

Published : Nov 21, 2019, 9:57 AM IST

Updated : Nov 21, 2019, 10:25 AM IST

नांदेड - निसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी यामुळे शेतीचा व्यवसाय दिवसेंदिवस जोखमीचा झाला आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल शेतकरी उचलत आहेत. परिणामी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. नांदेड जिल्ह्यात २०१९ सालामध्ये जानेवारी ते नोव्हेंबर अशा ११ महिन्यांत एकूण १०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यापैकी ८८ शेतकऱ्यांना पात्र ठरवून प्रशासनाने शासकीय मदत दिली आहे. तर ११ शेतकरी शासकीय मदतीसाठी अपात्र ठरले आहेत.

शेतकरी आत्महत्या

हेही वाचा- माजी मंत्री सुरेश जैनांना वैद्यकीय उपचारासाठी ३ महिन्यांचा जामीन मंजूर

लाखोंचा पोशिंदा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो बळीराजाच संकटात सापडला आहे. कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारी नापिकी, तर कधी कर्जबाजारीपणामुळे त्याच्यावर दुहेरी संकट आले आहे. परिणामी पुरता खचून गेलेला शेतकरी अनेकदा मृत्यूला कवटाळतो, असे दिसून आले आहे. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच आहे. सरकारकडून वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न होतो. परंतु, अस्मानी संकटात सापडलेला बळीराजा त्यातून स्वतःला सावरू शकत नाही. अनेकदा कर्जबाजारीपणामुळे देखील त्याला टोकाचे पाऊल उचलावे लागते.

खासगी सावकाराचा पाश त्याच्या भोवती असतो. त्यामुळे त्यातून स्वतःची सुटका त्याला करता येऊ शकत नाही. परिणामी आयुष्य संपविण्याचा निर्णय शेतकरी घेतो. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये एकूण १०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जानेवारी महिन्यात ७ तर फेब्रुवारी व मार्च महिन्यात प्रत्येकी दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मे महिन्यात १२ तसेच जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी ११ तर ऑगस्ट महिन्यात १३ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. नोव्हेंबर महिन्यात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ८८ शेतकरी शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तसेच ११ शेतकऱ्यांना मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. तर ८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.

Intro:नांदेड जिल्ह्यात ११ महिन्यात शंभराहून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले....!

नांदेड : निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत ची नापिकी यामुळे शेतीचा व्यवसाय दिवसेंदिवस जोखमीचा झाला आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल शेतकरी उचलत आहेत. परिणामी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. नांदेड जिल्ह्यात २०१९ सालामध्ये जानेवारी ती नोव्हेंबर अशा ११ महिन्यांतच एकूण १०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यापैकी ८८ शेतकऱ्यांना पात्र ठरवून प्रशासनाने शासकीय मदत दिली आहे. तर ११ शेतकरी शासकीय मदतीसाठी अपात्र ठरले आहेत. Body:नांदेड जिल्ह्यात ११ महिन्यात शंभराहून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले....!

नांदेड : निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत ची नापिकी यामुळे शेतीचा व्यवसाय दिवसेंदिवस जोखमीचा झाला आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल शेतकरी उचलत आहेत. परिणामी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. नांदेड जिल्ह्यात २०१९ सालामध्ये जानेवारी ती नोव्हेंबर अशा ११ महिन्यांतच एकूण १०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यापैकी ८८ शेतकऱ्यांना पात्र ठरवून प्रशासनाने शासकीय मदत दिली आहे. तर ११ शेतकरी शासकीय मदतीसाठी अपात्र ठरले आहेत.

लाखोंचा पोशिंदा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो बळीराजाच संकटात सापडला आहे. कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारी नापिकी तर कधी कर्जबाजारीपणाम त्याच्यावर दुहेरी संकट आले आहे. परिणामी पुरता खचून गेलेला शेतकरी अनेकदा मृत्यूला कवटाळतो, असे दिसून आले आहे. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच आहे. शासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न होतो. परंतु, अस्मानी संकटात सापडलेला बळीराजा त्यातून स्वतःला सावरू शकत नाही. अनेकदा कर्जबाजारीपणामुळेदेखील त्याला टोकाचे पाऊल उचलावे लागते. खाजगी सावकाराचा पाश त्याच्या भोवती असतो. त्यामुळे त्यातून स्वतःची सुटका त्याला करता येऊ शकत नाही . परिणामी आयुष्य संपविण्याचा निर्णय शेतकरी घेतो. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये एकूण १०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जानेवारी महिन्यात ७ तर फेब्रुवारी व मार्च महिन्यात प्रत्येकी दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मे महिन्यात १२ तसेच जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी ११ तर ऑगस्ट महिन्यात १३ शेतकऱ्यांनी मृत्युला जवळ केले. नोव्हेंबर महिन्यात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ८८ शेतकरी शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तसेच ११ शेतकऱ्यांना मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. तर ८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.Conclusion:
Last Updated : Nov 21, 2019, 10:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.