नांदेड - जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 263 अहवालांपैकी 1 हजार 450 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 686, तर अँटिजेन तपासणीद्वारे 764 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 52 हजार 342 एवढी झाली असून यातील 40 हजार 118 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
हेही वाचा - रेमडेसिवीर औषधाचा कृत्रिम तुटवडा दूर करा अन्यथा भाजपाचा घेराव आंदोलनाचा इशारा
आजच्या घडीला 10 हजार 979 रुग्ण उपचार घेत असून 189 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. 4 ते 7 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 996 एवढी झाली आहे.
1 हजार 227 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी
आज 1 हजार 227 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 6, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 822, कंधार तालुक्यांतर्गत 6, किनवट कोविड रुग्णालय 19, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 3, अर्धापूर तालुक्यांतर्गत 23, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 20, उमरी तालुक्यांतर्गत 34, नायगाव तालुक्यांतर्गत 11, मुखेड कोविड रुग्णालय 45, देगलूर तालुक्यांतर्गत 30, खासगी रुग्णालय 114, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 4, हदगाव कोविड रुग्णालय 19, माहूर तालुक्यांतर्गत 8, बिलोली तालुक्यांतर्गत 32, लोहा तालुक्यांतर्गत 31, असे एकूण 1 हजार 227 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.64 टक्के आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकूण घेतलेले स्वॅब - 3 लाख 55 हजार 194
एकूण निगेटिव्ह स्वॅब - 2 लाख 95 हजार 750
एकूण पॉझिटिव्ह व्यक्ती - 52 हजार 342
रुग्णालयातून एकूण सुट्टी दिलेली संख्या - 40 हजार 118
एकूण मृत्यू संख्या - 996
उपचारानंतर बाधित बरे होण्याचे प्रमाण - 76.64 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णित संख्या - 7
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - 47
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - 365
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित - 10 हजार 979
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले - 189.
हेही वाचा - केंद्रीय पथकाचा नांदेडमध्ये कोरोना परिस्थिती पाहणी दौरा