नागपूर - सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला नतंर ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले. यामुळे अनेक राजकीय पक्षांनी निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. पण राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 16 जागेसाठी तर 31 गणासाठी म्हणजेच पंचायत समिती सदस्यांसाठी 19 जुलैला मतदान होणार आहे. यात नागपूर जिल्हा परिषदेवर सध्या काँग्रेसची सत्ता आहे. यामुळे निवडणूकीत चांगली रंगात येणार आहे.
चार सदस्य अतिरिक्त
ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण हे 27 टक्क्यांच्यावर गेल्याने चार सदस्य हे अतिरिक्त ठरले. यामुळे नागपूर जिल्ह्या परिषदेतील 16 ओबीसी प्रवर्गातील सदस्याचे सदस्तव रद्द केले आहे. यात साडेसात वर्षानी जिल्हा परिषदेची निवडून सर्वोच्च न्यायलयाचा आदेशाने घेण्यात आली होती. ही निवडणूक डिसेंबर 2019मध्ये पार पाडत असताना यात 10 जागा अनुसूचित जातीला, 7 जागा अनुसूचित जमातीला तसेच ओबीसी प्रवर्गाला 16 जागेचे वाटप करण्यात आले. पण यात ओबीसीसाठी 27 टक्के आरक्षण राखीव असताना 16 जागा निघाल्याने आरक्षण हे 50 टक्यांच्यावर गेले. या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली. यामुळे 4 जागा अतिरिक्त होत असताना निकाल देतांना 16 जागेवरील सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यानंतर 23 मार्चला आरक्षणाची सोडत काढण्यात आली असून यापैकी 8 जागा या महिलांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. आता या जागेवर होऊ घातलेल्या निवडणुका नक्कीच मजेदार ठरणार आहे.
सद्याच्या स्थितीत जिल्हा परिषदेत संख्याबळ
नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता असुन मंत्री सुनील केदार यांच्या गटाचे वर्चस्व आहे. काँग्रेसकडे 30 जागेचे संख्याबळ आहे. यात राष्ट्रवादीकडे 10 जागा, भाजपकडे 15, शिवसेनेकडे केवळ 1 जागा, तर शेकाप 1 असे संख्याबळ आहे. या 58 जागेपैकी आता 16 जागेवर निवडणूक होणार आहे. यात रद्द झालेल्या 16 जागेपैकी 7 जागा कॉंग्रेस, 4 जागा राष्ट्रवादी, 4 जागा भाजप, तर 1 जागा शेकापच्या ताब्यात होत्या. मात्र, निवडणूक झाल्यानंतर फायदा कोणाचा आणि तोटा कोणाचा होणार हे महत्वाचे असून निवडणूक रंगतदार होणार आहे. मॅजिक फिगर 30 असल्याने यात सत्ताबदल तर होणार नाही ना याकडे लक्ष लागले आहे.
कसा असणार कार्यक्रम?
29 जुलैपासून अर्ज भरले जाणार आहे. 6 जुलैला छाननी करून वैद्य ठलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार. 12 जुलैला चिन्ह वाटप, 19 ला मतदान आणि 20 जुलैला मतमोजणी होणार आहे.