ETV Bharat / state

'आपली बस' सुरू करण्याच्या मागणीसाठी युवासेनेनी घेतली आयुक्तांची भेट - nagpur aapli bus news

अनलॉक प्रक्रियेअंतर्गत शहरातील सर्वच कार्यालय, कंपन्या सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे लोकांना दैनंदिन प्रवास करण्यासाठी शहर बसची गरज आहे. त्यामुळे 'आपली बस'सेवा तातडीने सुरू करा, अशी मागणी नागपूर युवा सेनेकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांना निवेदन देत ही मागणी करण्यात आली आहे.

'आपली बस' सुरू करण्याच्या मागणीसाठी युवासेनेनी घेतली आयुक्तांची भेट

author img

By

Published : Oct 18, 2020, 4:51 PM IST

नागपूर - गेल्या ६-७ महिन्यापासून बंद असलेली 'आपली बस' सेवा पुन्हा सुरू करा, या मागणीसाठी विविध स्तरातून महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरातील युवासेनेकडूनही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांची भेट घेत शहर बससेवा तत्काळ सुरू करा, अशी मागणी करण्यात आली आहे. जवळजवळ सर्वच कार्यालय सुरू झाले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला प्रवास करताना अडचणी येत असून सात दिवसात बस सेवा सुरू करा, अशी मागणीही यावेळी युवा सेनेच्या वतीने निवेदनामार्फत करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया देताना युवा सेनेचे पदाधिकारी

अनलॉक झाल्यानंतर शहरातील सर्वच कार्यालय, कंपन्या सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे लोकांना दैनंदिन प्रवास करण्यासाठी शहर बसची गरज आहे. त्यामुळे 'आपली बस'सेवा तातडीने सुरू करा, अशी मागणी नागपूर युवा सेनेकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात आज मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांना निवेदन देत ही मागणी करण्यात आली आहे. शिवाय गेल्या सहा महिन्यापासून उभ्या असलेल्या बसेसचे हाल पाहता दैनंदिन बससेवा सुरळीत झाल्यास मनपालाही आर्थिक फटका बसणार नाही, अशी विनंतीही या निवेदनाव्दारे युवासेनेने केली आहे.

'आपली बस'सेवा सुरू करण्याबाबत काही दिवसांपूर्वीच बैठक पार पडली होती. त्या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा सर्वानाच लागली होती. मात्र, त्यावर अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे येत्या सात दिवसात बसबाबत निर्णय घेऊन शहर बससेवा सुरू करण्यात यावे, अशी मागणीही युवासेनेची आहे. यावर आयुक्तांकडूनही लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासनही देण्यात आले आहे. त्यामुळे आपली बससेवा लवकर सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही यावेळी युवा सेनेकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा - गेल्या तीन वर्षात राज्यात रस्ते अपघातात घट ! मृतांचा दरातही घट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.