ETV Bharat / state

नागपुरात कन्हान नदीच्या पुरात अडकलेल्या महिलेला वाचवण्यात यश

खापरखेडा येथील सिलेवाडा परिसरातून कन्हान नदी वाहते. आज सकाळी सिलेवाडा येथील वृद्ध महिला सुमित्रा आसोले नदीपरिसरात गेली असता ती पुरामध्ये अडकली.

महिलेला कन्हान नदीच्या पुरातून वाचवताना तरुण
author img

By

Published : Jul 2, 2019, 5:33 PM IST

Updated : Jul 2, 2019, 7:41 PM IST

नागपूर - शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कन्हान नदीला पूर आला आहे. या पुरामध्ये अडकलेल्या एका वृद्ध महिलेला वाचवण्यात दोन तरुणांना यश आले आहे.

महिलेला कन्हान नदीच्या पुरातून वाचवताना तरुण

खापरखेडा येथील सिलेवाडा परिसरातून कन्हान नदी वाहते. आज सकाळी सिलेवाडा येथील वृद्ध महिला सुमित्रा आसोले नदी परिसरात गेली असता ती पुरामध्ये अडकली. ती मदतीसाठी ओरडत होती. दरम्यान, अंकीत यादव आणि विनोद भारद्वाज हे दोन तरुण पुलावरून जात असताना तिचा आवाज कानी पडला. त्यांनी जिवाची पर्वा न करता नदीपात्रात उडी घेतली आणि तिला बाहेर काढले.

kanhan river flood nagpur
पुरातून वृद्ध महिलेला वाचवणारे तरुण

Intro:नागपूरसह राज्यात पावसाने जोर धरला असताना अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे....आज नागपूर जिल्ह्याच्या कन्हान नदीला अचानक आलेल्या पुरात एक वृद्ध महिला अडकल्याचे दृश्य दोन तरुणांच्या नजरेस पडतात त्यांनी जीवाची पर्वा न करता त्या महिलेचा जीव वाचवला आहे...ही संपूर्ण घटना स्थानिक नागरिकांनी मोबाईल मध्ये कैद केली आहे Body:कन्हान नदीत अचानक पुर आल्याने खडकावर अडकलेल्या एका वृद्ध महिलेला दोन तरुणांनी वाचविल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील सिलेवाडा येथे कन्हान नदीच्या पात्रात सुमित्रा आसोले ही वृद्ध महिला कपडे धुण्यासाठी गेली होती. अचानक नदीपात्रात पुर आल्याने महिला खडकावरच अडकून पडली. दरम्यान वृद्ध महिला नदीपात्रात अडकिल्याने अंकित यादव आणि विनोद भारद्वाज या दोघांनी कन्हान नदीत उडी मारून पाण्याच्या प्रवाहाने महिलेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. खडकावर पोहचून या तरुणांनी वृद्ध महिलेचा जीव वाचविला.Conclusion:
Last Updated : Jul 2, 2019, 7:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.