नागपूर - देशातील वाढत्या महागाईने लोकांचे नुकसान केले आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर सर्वाधिक युवकांचे नुकसान झाले आहे. देशातील तरुण हे बेरोजगार झाले आहे. यामुळे हे युथ येणाऱ्या 2024 निवडणुकीत हे भाजपचे सरकार उलथून लावतील आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असा इशारा राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला. ते नागपुरात संविधान चौकात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या हल्ला बोल आंदोलना दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलत होते.
युवक काँग्रेसच्या वतीने सध्याच्या वाढत्या महागाई विरोधात सोमवारी हल्ला बोल आंदोलन केले. यावेळी युवक काँग्रेसने महागाई आणि मोदी सरकार विरोधात हातात फलक घेऊन वाढत्या महागाईचा विरोध केला. यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मोर्चाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे ही यावेळी आले होते. इंग्रजांना घाबरली नाहीयावेळी बोलताना म्हणाले लोकशाही पद्धतीने सरकार टिकवायचे असेल तर लोकांच्या विश्वासाने ही टिकवली पाहिजे. पण हे सरकार लोकांना धमकवण्याचे काम करत आहे. पण या सरकारला विसर पडला आहे की, ही जनता इंग्रजांना घाबरली नाही तर या तानाशाहीला काय घाबरणार नाही. 2024 मध्ये या सरकारला घराचा रस्ता पहावा लागेल हे आवाहन आहे असेही मंत्री सुनील केदार यावेळी म्हणाले. पण युथ काँग्रेस असो की काँग्रेस असो हे सामान्य माणसाच्या पाठीशी आहे. युवक काँग्रेसचे हल्ला बोल आंदोलन महागाईने सामान्य लोकांच्या हाताबाहेरमहागाई आटोक्याच्या बाहेर गेली आहे. या महागाईमुळे सर्व सामान्य नागरिकांचे जीवन हैराण झाले आहे. आपले कुटुंब कसे चालावे, मुलांना शिक्षण कसे द्यावे, मुलीचे लग्न कसे करावे एखादी मोठी समस्या आल्यास कसे तोंड द्यावे या विवंचनेत अडकला आहे. हुकूमशाही पद्धतीने वागत आहे
यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही पायदळ मार्चमध्ये सहभाग घेतला. यात भाजप सरकारन ज्या पद्धतीने हुकूमशाहीने वागत आहे. लोकांचाईडी, सीबीआयच्या माध्यमातून दडपशाहीने काम करत आहे. फोन टॅपिंग करून हेरगिरी केली जात आहे हे सर्व संविधाना विरोधी काम चालू आहे, जीवनावश्यक वस्तू किमती वाढल्या, पेट्रोल डिझेलच्या किमतीने महागाई वाढली आहे, जनतेचे आर्थिक शोषन केले जात आहे. या विरोधात काँग्रेस पक्ष युवा हे रस्त्यावर उतरून काम करत आहे म्हणत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला.
संसदेला घेराव घालणारयावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाला राऊत याच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये युवक काँग्रेसकडून पायदळ मार्च काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी वाहतूक पोलीस कार्यलय परिसरात आंदोलकांना थांबवत मोजक्याच लोकांना निवेदन देण्यासाठी परवानगी दिली आहे. यात कुणाला राऊत यांच्यासह पदाधिकार्यांनी निवेदन दिले. यावेळी युवक काँग्रेस हे दिल्लीला होऊ घातल्या 5 ऑगस्टच्या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जाईल अशी माहिती युवक काँग्रेसकडून देण्यात आली आहे. हेही वाचा - राज्यात एक कोटी पूर्ण 'लसवंत', 3.16 कोटी लोकांना मिळाला पहिला डोस