ETV Bharat / state

नागपुरातील गुमगाव शिवारात प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या - नागपूर क्राईम न्यूज

सुखदेव देवाजी विरखडे, गुमगाव हा मासेमारी करण्यासाठी सोमवारी घरून निघाला होता. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. या संदर्भात पोलीस ठाण्यात सुखदेव बेपत्ता झाल्याची सूचना पोलिसांना देण्यात आली होती. सुखदेवचे नातेवाईक त्याचा हिंगणा परिसरात शोध घेत असताना बुधवारी सायंकाळी उशिरा वागधरा-गुमगाव येथील जुन्या बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाऊस जवळ त्याचा मृतदेह आढळून आला.

Young man killed in love affair in Nagpur
नागपुरातील गुमगाव शिवारात प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या
author img

By

Published : Jul 29, 2021, 12:43 PM IST

नागपूर - शहराच्या लगत असलेल्या हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुखदेव देवाजी वरखडे (३०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून सुखदेवचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सुखदेवने आत्महत्या केल्याचा बनाव आरोपींनी केला होता. मात्र, पोलीस तपासात ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दोन संशयितांची चौकशी सुरू आहे अशी हिंगणा पोलिसांनी माहिती दिली आहे.

नागपुरातील गुमगाव शिवारात प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या

ओढणीने गळा आवळून केली हत्या -

सुखदेव देवाजी वरखडे, गुमगाव हा मासेमारी करण्यासाठी सोमवारी घरून निघाला होता. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. या संदर्भात पोलीस ठाण्यात सुखदेव बेपत्ता झाल्याची सूचना पोलिसांना देण्यात आली होती. सुखदेवचे नातेवाईक त्याचा हिंगणा परिसरात शोध घेत असताना बुधवारी सायंकाळी उशिरा वागधरा-गुमगाव येथील जुन्या बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाऊस जवळ त्याचा मृतदेह आढळून आला. लागलीच याची माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली. सुखदेवचे दोन्ही हात ओढणीने बांधलेले होते. शिवाय त्याच्या गळ्याला सुद्धा ओढणी गुंडाळलेली होती, यावरून पोलिसांनी सुखदेवची हत्या गळा आवळून केली असावी असे सांगितले आहे.

आरोपींनी आत्महत्येचा केला होता बनाव -

सुखदेवच्या गळ्यात अडकलेल्या ओढणीचे एक टोक पंप हाऊसच्या इमारतीला असलेल्या लोखंडी रॉडला बांधलेले होते. सुखदेवने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा देखावा आरोपींनी तयार केला होता. मात्र, ओढणी तुटल्याने मृतदेह खाली पडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हत्येचा गुन्हा दाखल -

सुखदेवच्या मृत्यू प्रकरणी हिंगणा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा खून प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय सुखदेवच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मृतकाचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. तिचे लग्न ठरल्यानंतर मुलीच्या भावासोबत सुखदेवचे भांडण झाल्याची माहिती समजली आहे. याप्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.