ETV Bharat / state

जागतिक मौखिक आरोग्य दिन: शारिरीक आरोग्यासोबतच मौखिक आरोग्य जपणेही महत्वाचे - तोंडाची निगा कशी राखाल

विदर्भातील तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मौखिक रोगांचे प्रमाण देखील झपाट्याने वाढत आहे. एवढंच काय तर लहान मुलांमध्येही मौखिक रोगाची वाढती टक्केवारी सर्वांची चिंता वाढवणारी आहे. ग्रामीण भागात ही समस्या तर फारच गंभीर झालेली आहे. वडिलांसोबतच घरातील पुरुष मंडळी सर्वांच्या देखत तंबाखू, खर्रा आणि धूम्रपानसह विविध व्यसन करत असल्याने लहान मुले त्यांचे अनुकरण करत असल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे.

world-oral-health-day-special-story
जागतिक मौखिक आरोग्य दिन
author img

By

Published : Mar 20, 2021, 2:59 PM IST

Updated : Mar 20, 2021, 4:41 PM IST

नागपूर - आज जागतिक मौखिक आरोग्य दिवस आहे. या निमित्ताने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालयाच्यावतीने प्रत्येकाने आपले मुख आरोग्य कसे जपावे, या संदर्भात जनजागृती केली आहे. मौखिक सौंदर्य तुमचे व्यक्तिमत्त्व उजळण्यासाठी किती महत्वाचे आहे, याची जाणीव सर्वांनाच असते. मात्र, मौखिक आरोग्य जपण्यासाठी कुणीही फारसे कष्ट किंवा विशेष प्रयत्न करत नसल्याने भविष्यात गंभीर रोगांचा सामना करावा लागतो, अशी माहिती बालदंत रोग विभाग प्रमुख डॉक्टर रितेश कळसकर यांनी दिली आहे. जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्ताने त्यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा त्यांनी विदर्भात मौखिक आरोग्याच्या गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.

विदर्भातील तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मौखिक रोगांचे प्रमाण देखील झपाट्याने वाढत आहे. एवढंच काय तर लहान मुलांमध्येही मौखिक रोगाची वाढती टक्केवारी सर्वांची चिंता वाढवणारी आहे. ग्रामीण भागात ही समस्या तर फारच गंभीर झालेली आहे. वडिलांसोबतच घरातील पुरुष मंडळी सर्वांच्या देखत तंबाखू, खर्रा आणि धूम्रपानसह विविध व्यसन करत असल्याने लहान मुले त्यांचे अनुकरण करत असल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे.

जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. रितेश कळसकर यांच्याशी साधलेला संवाद..
लहान चिमुकले मुख कर्करोगाच्या उंबरठ्यावर - सडक्या सुपारी पासून तयार होत असलेला गुटख्याची नागपूरसह संपूर्ण विदर्भात सर्रासपणे विक्री केली जाते. प्रत्येक पान ठेल्यावरच नाही तर किराणा मालाच्या दुकात देखील गुटका, तंबाखू, सिगारेट सारखे पदार्थ अगदी सहजपणे उपलब्ध होतात. त्यामुळे सुरुवातीला कुटुंबीयांची नजर चुकववून ग्रामीण भागातील लहान मुले घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे अनुकरण करून बघतात. मात्र, त्यानंतर त्यांना ती नशा हवी-हवीशी वाटू लागले तेव्हा ती मुलं व्यसनांच्या जाळ्यात ओढली जातात. त्यामुळे विदर्भाच्या ग्रामीण भागातील चिमुकले मुख कर्करोगाच्या उंबरठ्यावर असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञ डॉक्टरांनी काढला आहे. शिक्षणाचा अभाव कारणीभूत - गुटखा, खर्रा खाल्याने आणि धुम्रपान केल्याने कर्करोग होतो, या बाबतची माहिती ही शाळा महाविद्यालयातून दिली जाते. मात्र, ज्या प्रमाणात या विषयाची जनजागृती केली जायला हवी, तेवढी माहिती देण्यात येत नाही. त्यामुळे केवळ जुजबी माहिती देऊन चालणार नसल्याचे मत डॉ. रितेश कळसकर यांनी व्यक्त केले आहे. सतत खर्रा आणि तंबाकूचे सेवन केल्यामुळे व्यसन करणाऱ्या व्यक्तीला तोंड उघडणे देखील कठीण जात असल्याचा समस्या वाढत आहेत. याकडे देखील व्यसन करणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष जनजागृतीच्या माध्यमातून वेधणे गरजेचे झाले आहे.दुभंगलेल्या टाळूची समस्या गंभीर -

विदर्भात दुभंगलेल्या टाळूचे रुग्ण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दुभंगलेल्या टाळू म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर त्याचे ओठ हे दुभंगलेले असतात. मुळात ही समस्या आई मुळे बाळाच्या वाट्याला येते. ज्यावेळी स्त्रीला गर्भधारणा होते तेव्हा नकळत त्याकडे दुर्लक्ष होत. त्यामुळे गर्भवती मला स्वतःच्या पोषक आहाराकडे दुर्लक्ष करते, त्यामुळे दुभंगलेल्या टाळू चे रुग्ण विदर्भात वाढत आहेत. एकट्या शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात दोन दोन रुग्ण दुभंगलेल्या टाळूवर शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तोंडाची निगा राखण्यासाठी प्रत्येक व्यसन करणाऱ्या व्यक्तीने ते व्यसन सोडणे गरजेचे आहे.

हेही वाचा - 'लॉकडाऊन हा पर्याय नाही; पण, प्रशासनाला वाटत असेल तर विरोध नाही'

Last Updated : Mar 20, 2021, 4:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.