ETV Bharat / state

विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, शेतकऱ्यांची झोप उडाली असताना सरकार मात्र सुस्त - विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

Winter session : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानवर विरोधकांनी बहिष्कार घातला. नागपूरच्या रविभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही सभागृहांच्या विरोधी पक्षनेत्यांनी ही माहिती दिली. दंगल, कायदा, सुव्यवस्था, दुष्काळ, याकडं सरकारचं दुर्लक्ष असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

winter session
winter session
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 9:35 PM IST

विरोधी पक्षाची पत्रकार परिषद

नागपूर Winter session : दुष्काळ, पाणीटंचाई अवकाळी पावसानं राज्यात थैमान घातलं असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची झोप उडाली असून सरकार मात्र सुस्त आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सरकारवर केली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नागपुरातील रविभवन येथे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, शेकापचे जयंत पाटील, आमदार राजेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती : राज्यात शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती असल्यामुळं सरकारनं चहापानाचा कार्यक्रम टाळायला हवा होता. त्यातून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश गेला असता. मात्र, शेतकऱ्यांप्रती सरकारनं संवेदनशीलता दाखवली नाही. संपूर्ण राज्यातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई, अवकाळी पावसामुळं होरपळत आहे. त्यामुळं आम्ही सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला, असं विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

सरकारचा संवेदनशीलपणा हरवला : राज्यावरील वाढलेलं कर्ज, शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती, कृषी क्षेत्राची दयनीय अवस्था, सरकारी रुग्णालयातील मृत्यूचे प्रमाण, राज्यातील पाणीटंचाईची परिस्थिती, स्मारकांची अवस्था, आरक्षणाबाबत असंवेदनशीलता, अल्पसंख्याक समाजाप्रती असलेली नकारात्मक वृत्ती, तरुणांमध्ये वाढत चाललेला रोष राज्यभरात वाढत आहे. कंत्राटी भरती, बेरोजगारी, कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांवर सरकारचा प्रभाव, अशा अनेक समस्या असताना सरकार चहापानाचा कार्यक्रम करत आहे. यावरून सरकारची संवेदनशीलता हरवल्याचं दिसून येतं, असं वडेट्टीवार म्हणाले.

पुरोगामी महाराष्ट्राची ओळख आता दंगलग्रस्त : छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला दंगलग्रस्त महाराष्ट्र म्हणून महायुती सरकारनं मान्यता दिली. सर्वाधिक दंगली पुरोगामी महाराष्ट्रात झाल्या. 2022 मध्ये महाराष्ट्रात दंगलीची तब्बल 8 हजार 218 प्रकरणं नोंदवली गेली. महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्यात दंगली, बलात्काराच्या घटना वाढल्या. संत्रानगरी असलेल्या नागपूरची ओळख आता चोरांची राजधानी अशी झाली आहे. महाराष्ट्राला अशी ओळख मिळणार असेल, तर राज्यात गुंतवणूक कशी येणार?, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.

महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या : महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्याची माहिती एनसीआरबीच्या अहवालात समोर आली आहे. गरीबी, बेरोजगारीमुळं जगणं असह्य झाल्यानं अनेकांनी आत्महत्या केल्याचं अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्रात एका वर्षात 22 हजार 746 आत्महत्या झाल्याची नोंद आहे. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. शेती क्षेत्रात दर तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. NCRB आकडेवारी नुसार 2022 साली राज्यात सगळ्यात जास्त नागपूर मध्ये 2 हजार 503 चोरीच्या घटना झाल्या आहेत. महायुती सरकार आल्यावर महाराष्ट्र राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

गुन्हेगारीत महाराष्ट्र अव्वल : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, महाराष्ट्रचा खुनाच्या घटनेत तिसरा, बलात्कारात घटनेत चौथ्या क्रमांकावर आहे. मराठवाड्यात बीडमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. तरीही शासन आपल्या दारी कार्यक्रमात प्रचंड उधळपट्टी सुरू आहे. ही उधळपट्टी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखंच आहे. उधळपट्टी ऐवजी शेतकऱ्यांना सरकारनं मदत करावी, असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

शासन आपल्या दारी" योजनेचा फोलपणा : राज्यातील प्रत्येक माणसाच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढला असुन सरकारच्या उधळपट्टीमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. शासनाचे आरोग्य व्यवस्थेकडे होणारे दुर्लक्ष हे महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्याला भूषणावह नाही हे खेदाने म्हणावे लागते. महाराष्ट्र हे फुले, शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचा वारसा जपणारे राज्य असून या सरकारने मात्र जाती जाती मध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम सुरु केले आहे. मराठा व ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत बोटचेपेपणाची भूमिका घेतल्याचे दिसते. त्यामुळे मराठा व ओबीसी समाजामध्ये सरकार बद्दल प्रचंड रोष आहे. जनतेचे प्रश्न सरकारला सोडवता न आल्याने सरकारी तिजोरीतून आपली पाठ थोपठून घेण्याचा प्रयत्न शासन आपल्या दारी या योजनेद्वारे सुरु आहे. यामध्ये राज्य सरकार जनतेची कामे न करता जाहिरातबाजीवर भर देत आहे. "शासन आपल्या दारी" योजनेचा फोलपणा दिसून येत आहे. आपल्या सरकारची कामगिरी खोटी असून प्रसिध्दी मात्र मोठी आहे. राज्य सरकारमधील अंतर्गत मतभेद, मंत्र्याची विसंगत विधाने, एकमेकांवर होणारी कुरघोडी, अंतर्गत सत्तास्पर्धा व हेवेदाव्यांमुळे प्रशासनाचे तीन तेरा वाजले आहेत. एकंदरीतच फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारांना काळिमा फासण्याचे काम आपल्या सरकार मार्फत केले जात आहे. चोर-चोर भाऊ-भाऊ सरकारची तिजोरी लुटून खाऊ, अशी या सरकारची अवस्था असल्याचा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

हेही वाचा -

  1. विखे पाटलांचा आमदार आशुतोष काळे यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा
  2. ओबीसी मराठा आरक्षण वाद ; तर मराठा शिल्लक राहणार नाही, छगन भुजबळ यांचा पुन्हा हल्लाबोल
  3. आरोग्य विभागाला भ्रष्टाचाराचा 'आजार'; अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार, विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.