ETV Bharat / state

वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्याला अटक, वाघाची हाडे जप्त

author img

By

Published : Aug 26, 2021, 1:09 PM IST

Updated : Aug 26, 2021, 9:56 PM IST

वाघांसह वन्य प्राण्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या आरोपींना महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तिक कारवाईत ताब्यात घेतले आहे. त्यांनी त्यांच्या कडून हरीण, वाघ यांच्यासह वन्य प्राण्यांची हाडे जप्त केली आहेत.

Wildlife smugglers arrested in Nagpur, Seized tiger bones
Wildlife smugglers arrested

नागपूर - महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश वनविभागाची सामूहिक कारवाईमध्ये वाघांसह वन्य प्राण्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. यात आरोपीकडून हाडे तेच दुसऱ्या कारवाईत हरणाचे शिंग आणि बंदूक जप्त करण्यात आले आहे. यामध्ये देवलापार आणि रामटेक वन विभागाच्या चमूने बालचंद बरकदे (40) याला वाघाच्या शिकार प्रकरणात तर इतर कारवाईत रोशन नंदलाल उईके आणि नरबद पुन्नू कोडवते असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Wildlife smugglers arrested in Nagpur, Seized tiger bones
वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्याला अटक

वन विभागाची दोन ठिकाणी कारवाई -

नागपूर जिल्ह्याच्या रामटेकचा येथील रहिवासी असलेला बालचंद बरकदे याला महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरून अटक करण्यात आली. तर देवलापार वन विभागाला काही लोक खवल्या मांजराचे खवले आणि वन्य प्राण्यांचे हाडाची विक्रीच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. यावरून देवलापार पिंडकपार भागातून रोशन उईके आणि 1 बंदूक, हरणाचे शिंग आणि रानडुकराची कवटी जप्त केली असता त्याच गावातील नरबद पुन्नू कोडवते यांच्याकडे 4 हरणाचे शिंग आणि बंदूक आणि सुरा असे सहित्य जप्त करण्यात आले. तसेच बुलेट गन पावडर ताब्यात जप्त केले.

9 किलो वाघ आणि वन्य प्राण्याचे हाडे जप्त -

वन विभाग हे मागील काही दिवसांपासून वन्य जीव आणि वाघांची शिकार करणाऱ्याच्या मागोवा घेत आहे. यात काही दिवसांपूर्वी चौघांना अटक करत त्यांच्याकडून वाघांचे पंजे आणि कातडी जप्त करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या भागात मोठ्या प्रमाणात जंगल व्याप्त भाग आणि वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे या भागात शिकारी सक्रिय आहे. वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरोकडून वन्यप्राण्यांच्या हाडे असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यात मंगळवारी रात्री खवास या गावातून बालचंद बरकदे टाळा याच्याकडून जवळपास 9 किलो वाघ आणि प्राण्याचे हाडे जप्त करण्यात आले.

वन विभागाने कसली कंबर -

यावेळी यापूर्वी बालचंद बरकदे यांची चौकशी केली असता त्याच्याकडून तीन ते चार वाघांची शिकार करून अवयव विक्री केल्याची कबुली दिली आहे. या संदर्भात त्याने हे वाघ नेमके कुठल्या परिसरातील होती. ज्यांची शिकार झाली ते नेमके कुठले होते याबाबत सविस्तर चौकशी करण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे. यात बालचंद याचा मध्यप्रदेशची चौकशी झाल्यानंतर वन विभागाकडून महाराष्ट्र मध्येही काही गुन्हे दाखल असून हरीण आणि वन्यप्राणी अवयव तस्करीत त्याला न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेतले जाणार आहे.

यांनी केली कारवाई -

वनप्राण्याची होत असलेल्या शिकार रोखण्यासाठी वन विभाग नागपूरचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा याचे प्रयत्न सुरू आहेत. ही कारवाई त्याच्या नेतृत्वात झाली असून साहाय्यक वन संरक्षण एन. जी. चांदेवार, रामटेक साह्यक वन संरक्षण संदीप गिरी, विभागीय वन अधिकारी पीजी कोडापे, तसेच वनपरीक्षेत अधिकारी आणि वनक्षेत्रपाल आणि त्यांच्या चमूने या आरोपींना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - मुंबईच्या विद्यार्थीनीवर म्हैसूरमध्ये सामूहिक बलात्कार, प्रियकराला केली बेदम मारहाण

Last Updated : Aug 26, 2021, 9:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.