ETV Bharat / state

नागपुरात पत्नीनेच दिली होती पतीच्या हत्येसाठी तीन लाखांची सुपारी; तिघांना अटक - नागपूर ग्रामीण पोलीस

प्रदीपची बायको सीमा बागडे, सुपारी घेऊन हत्या करणारा आरोपी पवन चौधरी आणि एका विधिसंघर्ष बालकाचा समावेश आहे. मृतक प्रदीप हा नेहमी बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत होता. ज्यामुळे त्यांचे वैवाहिक संबंध ताणले गले होते. रोज-रोजच्या भांडणाच्या कटकटीला कंटाळून सीमाने तिचा परिचय असलेल्या पवनला तीन लाखांची सुपारी दिली होती, असा कबुली जबाब आरोपीने पोलिसांना दिला आहे.

नागपूर पोलीस
नागपूर पोलीस
author img

By

Published : Sep 23, 2021, 4:46 PM IST

Updated : Sep 23, 2021, 5:06 PM IST

नागपूर - प्रदीप जनार्धन बागडे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा नागपूर ग्रामीण पोलिसांनी केला आहे. प्रदीपची हत्या त्याच्याच पत्नीने सुपारी देऊन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खापा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यामध्ये प्रदीपची बायको सीमा बागडे, सुपारी घेऊन हत्या करणारा आरोपी पवन चौधरी आणि एका विधिसंघर्ष बालकाचा समावेश आहे. मृतक प्रदीप हा नेहमी बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत होता. ज्यामुळे त्यांचे वैवाहिक संबंध ताणले गले होते. रोज-रोजच्या भांडणाच्या कटकटीला कंटाळून सीमाने तिचा परिचय असलेल्या पवनला तीन लाखांची सुपारी दिली होती, असा कबुली जबाब आरोपीने पोलिसांना दिला आहे.

माहिती देतांना पोलीस अधिकारी
मृतक प्रदीप बागडे हे प्रॉपर्टी डिलिंगचे काम करत होता. १५ सप्टेंबर रोजी प्रदीप काही कामाच्या निमित्ताने घरून निघाला होता. मात्र दोन दिवसानंतर देखील ते घरी परत आले नसल्याने त्यांची पत्नी सीमा बागडे यांनी अजनी पोलीस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान २१ सप्टेंबर रोजी एका व्यक्तीचा मृतदेह खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव-खेकडानाला परिसरातील जंगलात आढळून आला. पोलिसांना या संदर्भात माहिती समजताच त्यांनी घटनास्थळ गाठून तापस सुरू केला. तेव्हा तो मृतदेह प्रदीप जनार्धन बागडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीला पोलिसांना प्रदीपच्या हत्येमागील नेमक्या करणाचा शोध लागत नव्हता. मात्र पोलिसांनी मृतक प्रदीपच्या परिचीतांची चौकशी सुरू केली, तेव्हा पती पत्नीमधील ताणलेल्या वैवाहिक संबंधांची माहिती पोलिसांना कळाली. त्यानुसार खापा पोलिसांनी तपासाचा केंद्रबिंदू मृतकाची पत्नी सीमावर केंद्रित केल्यानंतर या हत्या प्रकरणाचा उलघडा झाला आहे.

हेही वाचा - नागपूर : बडेगावच्या जंगलातील खेकरानाला परिसरात एकाची हत्या

पतीची हत्या करण्यासाठी ३ लाखांची सुपारी

मृतक प्रदीप बागडे आणि त्याची पत्नी सीमा यांच्यात रोज भांडण होत होते. प्रदीप नेहमीच सीमाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. रोजच्या भांडणाला कंटाळून सीमाने नवऱ्याला मारण्यासाठी पवनला तीन लाखांची सुपारी दिली. सौदा पक्का झाल्यानंतर ५० हजार रूपये ऍडव्हान्स म्हणून देण्यात आले होते. काम झाल्यानंतर उर्वरित अडीच लाख रुपये देण्याचे सीमाने कबूल केले होते. सीमा आणि पवनने संगनमत करून प्लॅन तयार केला. पवनने प्रदीपचे अपहरण करून वरुडला नेले. तिथे प्रदीपची हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव-खेकडानाला परिसरातील जंगलात फेकून दिला होता.

हेही वाचा - मुंबई : भाजपा कार्यालयात बोलावून पदाधिकाऱ्याचा महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न

Last Updated : Sep 23, 2021, 5:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.