ETV Bharat / state

RSS VHP Bajrang Dal : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा काय आहे संबंध? - PFI

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच बजरंग दल हा देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरचं कामं करत आहे. आरएसएस प्रमाणेचं बजरंग दलाचा स्वतःचा इतिहास आहे. दोन्ही संघटना एकाचं विषयावर काम करत असली तरी दोन्ही संघटनेची रचना, कार्यशैली खूप वेगळी आहे. कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात हिंदत्ववादी बजरंग दलाची तुलना सिमी, पीएफआय या सारख्या दहशतवादी संघटनांशीही केली जात आहे.

Swayamsevak Sangh
Swayamsevak Sangh
author img

By

Published : May 6, 2023, 5:37 PM IST

Updated : May 6, 2023, 8:07 PM IST

दिलीप देवधवर यांची प्रतिक्रिया

नागपूर : कर्नाटकचा नवा कारभारी कोण, जनतेचा कौल कुणाच्या पारड्यात पडेल या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरचं मिळणार आहे. १० मे रोजी कर्नाटक येथे विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली जाईल. निवडणुकीआधी प्रचारतोफा आपल्या क्षमतेने कामाला लागल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडात असताना एक मुद्दा मात्र, प्रचाराच्या केंद्रस्थानी आलेला आहे आणि तो म्हणजे काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावार बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या हाती आयता मुद्दाचं लागला आहे. काँग्रेसकडून बजरंग दलाची तुलना पीएफआय या संघटनेसोबत केल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मग RSS आणि बजरंग दलाचा संबंध काय? ते कसे कार्य करतात ते पाहूया.

हिंदुत्वासाठी बजरंग दलाची स्थापना : १९६४ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली होती. म्हणूनचं
विश्व हिंदू परिषदेला संघ परिवारासोबत जोडलं जातं. त्यानंतर १९८४ मध्ये झाली विश्व हिंदू परिषदेने भारतात बजरंग दल स्थापना केली. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू परिषदेने आपली युवा शाखा बजरंग दलाची स्थापना केली. गेल्या ३८ वर्षात बजरंग दलाने आक्रमकपणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरचं लक्ष केंद्रित केलं. खरं पाहिलं तर बजरंग दल फ्रंटवर घेऊन हिंदुत्वाची लढाई लढत आहे असं देखील म्हटले जाते. बजरंग हे नाव राम भक्त हनुमानासोबत जोडले जाते. त्यांचा नारा आहे की सेवा, सुरक्षा आणि संस्कृती. बजरंग दल हे एक हिंदूवादी समाज संघटन आहे. देशात ज्या ठिकाणी हिंदूंवर अत्याचार होतात त्या विरुद्ध सदैव लढण्यास बजरंग दल तयार असते. या शिवाय ते गोहत्यावर प्रतिबंधाचे समर्थन करतात. तर हिंदू आणि मुस्लिम विवाह थांबावे यासाठी ही बजरंग दल आक्रमकपणे भूमिका घेत आली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातील नातं : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील सर्वात मोठी हिंदुत्ववादी सामाजिक, कौटुंबिक संघटना आहे असं म्हंटल जातं. २७ सप्टेंबर १९२५ यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती. संघ हा ९८ वर्षांचा झाला आहे. देशातील सर्वात मोठे संघटन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसचा उल्लेख होतो. संघाने १९६४ या वर्षी विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली. तर १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने बजरंग दल नावाने तरुणांची नवीन एक संघटना जन्माला घातली. संघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेविका समिती दोन मदर ऑर्गनायझेशन आहेत. १९६४ साली गुरुजी गोवळकर सरसंघचालकपदी असताना त्यांनी विश्व हिंदू परिषदेची नॉन पॉलिटिकल ग्लोबल ऑर्गनायझेशन म्हणून स्थापन केली. विश्व हिंदू परिषद ही संघ स्वयंसेवी निर्मित आणि संचालित संस्था आहे. बजरंग दल हे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचं अपत्य आहे. त्याच प्रमाणे विश्व हिंदू परिषद हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे अपत्य आहे हे या तिघांमध्ये असलेलं नातं आहे.

  • हेही वाचा -
  1. Uddhav Thackeray Visit To Barsu: शिंदे-फडणवीस सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत - उद्धव ठाकरेंचा निशाणा
  2. Baramulla Encounter : बारामुल्ला चकमकीत 1 दहशतवादी ठार, चकमक अजूनही सुरूच
  3. Support Barsu refinery : मातोश्रीवर खोके पोहोचावे यासाठी ठाकरेंचा रिफायनरीला विरोध, समर्थन मोर्चात राणेंची सडकून टिका

Last Updated : May 6, 2023, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.