नागपुर: भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी पैगंबरा बद्दल वक्तव्य केल्या नंतर सुरु झालेला वाद वाढतच चालला आहे. देश भरात ठिकठिकाणी निदर्शने सुरु आहेत. काही ठिकाणी यामुळे तणावपुर्ण वातावरण आहे. तसेच देशा बाहेरही या वर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत यातच आता काही हॅकरने पुढाकार घेतल्याचे पहायला मिळत आहे. नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स शासकीय विज्ञान महाविद्यालयाची वेबसाईट त्यांनी हॅक केली आहे. याची जवाबदारी ड्रॅगन फोर्स ऑफ मलेशिया या संघटनेने घेतल्याचा उल्लेख केला आहे. यात भारताविरुद्ध मोहीम म्हणून साईट हॅक केल्याचा मेसेज त्याच वेबसाईटवर पब्लिश करण्यात आला आहे. या संदर्भात कॉलेजकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण या साईटसर्च केली असता साईट हॅक झाल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : Violence in Nadia: नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे पडसाद कायम; बंगालमध्ये ठिकठिकाणी हिंसाचार